मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ (HPN): बँकिंग सेवांच्या क्षेत्रात क्रांती घडवताना एयू स्मॉल फायनान्स बँक (एयू एसएफबी) या भारताच्या एसएफबीने २४x७ व्हिडिओ बँकिंगच्या ग्राहक सेवांची सुरूवात करून एक अभूतपूर्व क्रांती घडवली आहे.
आर्थिक क्षेत्राला एक नवीन दिशा दाखवणारी एयू स्मॉल फायनान्स बँक अभिमानाने टेलर मेड व्हिडिओ असिस्टेड ब्रँच लाइक अनुभव आणून, वेळ किंवा स्थान काहीही असले तरी (आठवड्याचे सातही दिवस) ग्राहकांच्या बोटांवर एक उत्तम बँकिंग आणून पहिला उपक्रम राबवणारी बँक ठरली आहे. ही सेवा एक व्हर्चुअल प्लॅटफॉर्म देते, जिथे ग्राहक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या व्हिडिओ कॉलद्वारे रिअल टाइममध्ये व्हिडिओ बँकरशी संवाद साधू शकतात.
व्हिडिओ बँकिंगच्या क्षेत्रात सुरक्षिततेला सर्वोच्च स्थान आहे. एयू स्मॉल फायनान्स बँक अद्ययावत एन्क्रिप्शन, एआय ऊर्जाप्राप्त फेशियल रेकगनिशन, ओटीपी आणि स्वाक्षरी पडताळणी आणि व्हिडिओ व्हॅलिडेशनसोबत हे सुरक्षेचे मानक उंचावते आहे. प्रत्येक व्यवहार आणि गोपनीय माहिती अत्यंत बारकाईने सुरक्षित केली जाते आणि त्याद्वारे ग्राहक अत्यंत आत्मविश्वासाने प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात.
आता एयू एसएफबीचे ग्राहक रिअल टाइम अकाऊंट सपोर्ट, डेमोग्राफिक अपडेट्स, अडथळामुक्त आर्थिक व्यवहार, अत्यंत सुलभ कर्ज आणि क्रेडिट कार्ड चौकशा, सर्व बँकिंग संबंधांबाबत कार्यक्षम समस्या सोडवणूक तसेच इतर अनेक सुविधा सहजपणे घेऊ शकतात.
एयू एसएफबीच्या व्हिडिओ बँकिंगमधून पारंपरिक बँक शाखेचा अनुभव आपल्याला घेता येतो. या सेवा देशांतर्गत बाजारपेठांमध्ये विविध ग्राहक क्षेत्रांमध्ये घेता येतात. थोडक्यात सांगायचे तर एयूच्या २४x७ व्हिडिओ बँकिंगमधून बँकिंग सेवांची व्याप्ती मर्यादित पायाभूत सुविधा आणि स्त्रोतांच्या क्षेत्रात गेली असून त्यातून सुलभ आणि वैयक्तिकीकृत बँकिंग अनुभव मिळतो. तो तंत्रज्ञानस्नेही मिलेनियल्सच्या खास गरजा, नवीन बँकिंग ग्राहक, बिझी व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या गरजांसाठी अनुरूप आहे.
बँकेच्या डिजिटल फर्स्ट स्वप्नाला सत्यात उतरवताना एयू स्मॉल फायनान्स बँकेचे कार्यकारी संचालक श्री. उत्तम तिब्रेवाल म्हणाले की, “एयू स्मॉल फायनान्स बँकेचा चोवीस तास व्हिडिओ बँकिंगच्या क्षेत्रातील प्रवेश आधुनिक बँकिंगच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल दर्शवतो. सुट्टीच्या दिवशी आणि आठवड्याच्या दिवशीदेखील एयूच्या कार्यरत टीम समोरासमोर, मनुष्यकेंद्री संवादाची हमी देतात आणि त्यातून बँकेच्या राष्ट्रीय स्तरावरील बँकिंग अनुभवाच्या वचनबद्धतेला अधोरेखित केले जाते. आम्ही आमच्या ग्राहकांना साध्यता आणि सोय अभूतपूर्व उंचीवर नेऊन या डिजिटल क्षेत्रात सक्षमीकृत करतो.”
व्हिडिओ बँकिंग प्लॅटफॉर्मची सुरूवात २०२१ साली झाली असून त्याला देशभरात सातत्याने वाढणाऱ्या ग्राहक संख्येद्वारे प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याला टेलरमेड पद्धतीने सुलभ आणि वैयक्तिकीकृत पाठिंबा दिला गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ बँकिंगच्या माध्यमातून सर्वाधिक वापरल्या गेलेल्या सेवांमध्ये नवीन सेव्हिंग खाते, करंट अकाऊंट उघडणे क्रेडिट कार्ड रिलेशनशिप आणि इतर गोष्टी आहेत. त्यासोबत सेवांशी संबंधित उपाययोजना, आर्थिक व्यवहार आणि एंड-टू-एंड रिलेशनशिप मॅनेजमेंट या गोष्टीही आहेत. त्यामुळे लाखो कार्यरत वापरकर्त्यांपर्यंत ही बँक पोहोचली आहे. सर्वोत्तमतेप्रति एक कायमस्वरूपी वचनबद्धता दर्शवताना एयू स्मॉल फायनान्स बँक सातत्याने आपल्या उत्पादनांना लोकांपर्यंत पोहोचवते, समृद्ध करते आणि आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा देते.
No comments:
Post a Comment