Tuesday, 28 November 2023

फेडेक्स तर्फे नवी मुंबई येथील पॉवर नेटवर्किंग मीटच्या १० व्या सत्रासह भारतीय एसएमईजचे सक्षमीकरण



नवी मुंबई, 
 नोव्हेंबर २०२३ (HPN) - FedEx Corp. (NYSE: FDX) ची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक FedEx Express ने ‘पॉवर नेटवर्किंग मीट’ कार्यक्रमाच्या १० व्या सत्राची घोषणा केली. या कार्यक्रमातून भारतातील लहान आणि मध्यम-आकाराच्या व्यवसायांना (SMEs) सक्षम करण्यासाठीची कंपनीची अटूट बांधिलकी अधोरेखित होते. FedEx चांगल्या लॉजिस्टिक सोल्यूशन्सच्या सामर्थ्याचा उपयोग करून हे साध्य करतेहे सर्व डिजिटल नाविन्यपूर्णतेद्वारे आधारलेले असून त्याचा उद्देश व्यापार सुव्यवस्थित करणे आणि व्यवसायातील लवचिकता मजबूत करणे आहे.

 

नवी मुंबई मधील कार्यक्रमामध्ये ८४ पेक्षा जास्त ग्राहकांची आणि रसायनेऔद्योगिक साहित्यअभियांत्रिकी, ऑटोमोटीव्ह्जऔषधनिर्माण आणि इ-कॉमर्स या क्लस्टर्समधील संभाव्य ग्राहकांची  प्रभावी उपस्थिती होती. तिथे त्यांनी प्रश्नोत्तर आणि नेटवर्किंग सत्रात उत्साहाने भाग घेतला.

 

FedEx Express MEISA मार्केटिंगचे उपाध्यक्ष नितीन नवनीत तातीवाला म्हणाले, “एसएमईज भारताच्या आर्थिक विकासाला चालना देत आहेत. ५० वर्षांपेक्षा जास्त लॉजिस्टिक कौशल्यासहआम्ही एसएमईजला जागतिक व्यापारातील गुंतागुंतींमध्ये दिशादर्शन करण्यातत्यांच्या पुरवठा साखळींना अनुकूल करण्यात आणि त्यांना शाश्वत स्थितीत ठेवण्यास मदत करतो. आमच्या पॉवर नेटवर्किंग सत्रांसारखे मंच एसएमईज ला FedEx सोल्यूशन्स प्रभावीपणे समजून घेण्यास आणि वापरण्यात मदत करतात. ते एसएमईज साठी फीडबॅक देण्यासाठी एक क्षेत्र देखील तयार करतातत्याला आम्ही खूप महत्त्व देतोआमच्या सेवा वाढवण्यास मदत करतो. लॉजिस्टिक्सच्या पलीकडेया व्यवसायांना जागतिक संधींशी जोडणे आणि त्यांना या डिजिटल युगात भरभराट होण्यास मदत करत आम्ही स्वतःला विकास सक्षम करणारे म्हणून पाहतो.”

 

FedEx वर्धित एअर नेटवर्कद्वारे जलद ट्राझीट वेळेद्वारे वेग आणि विश्वासार्हता सादर करते. FedEx इंटरनॅशनल प्रायॉरिटी® सेवेद्वारे महत्वाच्या आणि तातडीची शिपमेंट आता दोन ते तीन व्यावसायिक दिवसांत जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आणि प्रदेशांपर्यंत पोहोचू शकते. * शिवायव्यवसाय आणि व्यक्ती विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या वाजवी किंमतीसह शिपिंग पर्याय निवड ऑप्टिमाइझ करू शकतात याची खात्री करत FedEx वर्धित अर्थव्यवस्था सेवा पुरवितेकमी तातडीच्या शिपमेंटची किफायतशीर आणि वेळेवर वितरणाची पूर्तता करतेFedEx International Connect Plus® (FICP) चा विस्तार आशिया पॅसिफिकमध्य पूर्व आणि आफ्रिकेतील १४ बाजारपेठांमध्ये देखील करण्यात आला आहे. यामुळे एक ते तीन व्यावसायिक दिवसांमध्ये या प्रदेशात बहुतेक शिपमेंट्स वितरीत करत कार्यक्षम गती आणि आकर्षक किमतींसह एक किफायतशीर ई-कॉमर्स आंतरराष्ट्रीय शिपिंग सोल्यूशन सादर करते*.


जागतिक बाजारपेठेत दिशादर्शन करण्यात एसएमईजना आणखी समर्थन देण्यासाठीFedEx डिजिटल इंटेलिजेंस खुले करून विस्तृत उपायसुविधा सादर करते. FedEx® Delivery Manager International (FDMi) सारखे संवादात्मक उपाय व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांना वितरण प्राधान्यक्रम व्यवस्थापित करण्याची अनुमती देऊ करतात. FedEx Ship Manager™ सह स्वयंचलित साधने एसएमईज ला फॉर्म अॅक्सेस् करण्यासाठीशिपिंग लेबले तयार करण्यास आणि सहजतेने दस्तऐवजीकरण तयार करण्यास सक्षम करतात. ‘इलेक्ट्रॉनिक विथ ओरिजिनल्स’ वैशिष्ट्य व्यवसायांना कस्टम दस्तऐवज डिजिटल पद्धतीने सबमिट करण्यास अनुमती देते.


FedEx भारतीय एसएमईजच्या वाढीला आणि यशाला पाठिंबा देण्यासाठी समर्पित आहे. आजच्या जागतिक बाजारपेठेत विकासासाठी भारतातील व्यवसायांकडे साधनेकौशल्य आणि स्त्रोत आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असून पॉवर नेटवर्किंग बैठका हा त्या मार्गांपैकी फक्त एक मार्ग आहे. आमच्या सेवांबद्दल अधिक माहितीसाठी आणि FedEx तुमचा व्यवसाय सक्षम कसे करू शकतात हे पाहण्यासाठी कृपया FedEx shipping service site ला भेट द्या.


*विशिष्‍ट असे निघण्याचे आणि पोहोचण्याचे स्थळ यांच्या तपशिलांसाठीकृपया आमचे गेट रेट आणि ट्रान्झिट वेळ पृष्‍ठ तपासा.


About FedEx Express

FedEx Express is the world's largest express transportation company, providing fast and reliable delivery to more than 220 countries and territories. FedEx Express uses a global air-and-ground network to speed the delivery of time-sensitive shipments by a definite time and date.

 

FedEx Express press releases are available here 

To learn more about the latest insights in the logistics industry, please visit:

FedEx Business Insights Hub

LinkedIn FedEx Go Global

 

 



No comments:

Post a Comment

न्‍यूगो च्या E-K2K इलेक्ट्रिक बस मोहिमेला ‘'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'’ कडून दुहेरी मान्यता मिळाली

मुंबई, 31डिसेंबर 2024 (HNS): ग्रीनसेल मोबिलिटी ची भारतातील सर्वात मोठी इंटरसिटी इलेक्ट्रिक बस सेवा न्‍यूगो च्या इलेक्ट्रिक बसने काश्मीर ते ...