मुंबई, 30 सप्टेंबर 2024 (HPN):- खिशात फक्त ५ रूपये होते, पण स्वप्न कोट्याधीश बनण्याचे होते. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याच्या आणि संपूर्ण विश्वाला आपल्या मुठीत आणण्याच्या स्वप्नांसह सतीश वाघ चिपळूण येथील त्यांच्या घरातून फक्त ५ रूपये घेऊन बाहेर निघाले. ते स्वत:ची स्वप्ने साकारण्यासाठी स्वप्ननगरी मुंबईमध्ये आले आणि नवीन जीवनाची सुरूवात केली. असे म्हणतात की मुंबई शहर प्रत्येकाला मोठे होण्याची संधी देते, पण काहींनी ही संधी गमावली देखील आहे. सतीश वाघ अथक मेहनत घेत आणि स्वत:ला झोकून देत स्वत:चे नशीब घडवण्यास उत्सुक होते. एखादी गोष्ट संपादित करण्याची तीव्र इच्छा असेल तर संपूर्ण विश्व तुम्हाला मदत करते. असे काहीतरी सतीश वाघ यांच्याबाबतीत घडले. सर्वसामान्य मुलांप्रमाणे आयुष्यात काय करायचं हा प्रश्न सतीशच्या मनात कायम होता. त्यांचे संपूर्ण कुटुंब केमिकलच्या व्यवसायात होते आणि त्यांच्या आईने त्यांना विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण करण्यास प्रेरित केले.
सतीश वाघ यांनी शिक्षण पूर्ण करून मामाकडे कामाला सुरुवात केली
या काळात सतीशचे मामा फार्मा कंपनी सुरू करण्याच्या प्रक्रियेत होते. ते सतीश यांना पगार द्यायचे. ९ वर्षांनंतर एके दिवशी सतीश त्यांच्या मामांशी बोलले आणि त्यांनी स्वतःहून काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. केमिकल उद्योगात जाण्याची सतीश यांचा कधीच विचार नव्हता, पण या उद्योगामध्ये आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना मागे टाकले.
खिशात फक्त ५ रुपये असल्याचे पाहून सतीश वाघ खूप रडले होते
कारखाना सुरू करण्यासाठी सतीश यांनी काकांना मदत केली होती. सतीश यांना कारखाना सुरू करण्यासाठी लागणारे लायसन्स आणि सर्व औपचारिकता चांगल्या प्रकारे माहित होत्या. याचा फायदा घेत सतीश यांनी स्वत:चा केमिकल कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र सतीश वाघ यांच्याकडे कारखाना सुरू करण्यासाठी पैसे नव्हते. सतीश यांनी पैसे जमवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नांना यश आले नाही. आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना, सतीश कारखान्यासाठी पैसे गोळा करण्याकरिता ६ महिने सर्वत्र फिरत होते, पण त्यांना कोणीही पैसे दिले नाहीत. एके दिवशी त्याच्या खिशात फक्त ५ रुपये शिल्लक होते आणि ते खूप रडले. ते नातेवाईकांकडे गेले, तरीही त्यांना कोणाकडूनही आर्थिक मदत मिळाली नाही. पण सतीश यांनी हार मानली नाही. त्याच पाच रुपयांतून सतीश सरकारी कार्यालये आणि बँकांना भेट देऊ लागले, जेणेकरून सरकार त्यांना जमीन देईल आणि बँका त्यांच्या प्रकल्पासाठी निधी देतील. पण हा मार्ग सोपा नव्हता. अथक मेहनत घेतल्यानंतर सतीश यांना अखेर यश मिळाले. सतीश वाघ यांची क्षमता पाहून बँकांनी कर्ज दिले आणि सरकारने जमिन दिली.
अँटी-हिस्टामाइन आणि अँटी-एलर्जिक औषधांची जगातील सर्वात मोठी उत्पादक आहे सुप्रिया लाइफसायन्स
१९८७ मध्ये सतीश यांनी सुप्रिया लाइफसायन्स नावाने स्वतःची फार्मा कंपनी सुरू केली आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. कंपनी यशाची शिखरे गाठू लागली. सुप्रिया लाइफसायन्सेस लिमिटेडचे सध्या १२० देशांमध्ये २००० हून अधिक ग्राहक आहेत आणि ४० हून अधिक सक्रिय फार्मास्युटिकल इन्ग्रिडियंट्स (एपीआय)च्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओसह जागतिक उपस्थिती आहे. सतीश वाघ यांच्या नेतृत्वांतर्गत कंपनी अमेरिका, युरोप, जपान, लॅटिन अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चीन इत्यादी देशांमध्ये मान्यता मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. सुप्रिया लाइफसायन्सेस सध्या अँटी-हिस्टामाइन, अँटी-एलर्जिक, व्हिटॅमिन आणि अॅनेस्थेटिक्स श्रेणींमध्ये फार्मास्युटिकल क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी उत्पादक आहे, जिने महाराष्ट्र आणि भारताला जगाच्या नकाशावर आणले आहे. आजपर्यंत, कंपनीने १००० हून अधिक व्यक्तींना रोजगार दिला आहे आणि सध्या ५७० कोटी रुपयांची उलाढाल आहे. कंपनीची उलाढाल १००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
सतीश वाघ महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत, पण कंपनीवर कोणतेही कर्ज नाही
खिशात फक्त ५ रूपये असताना व्यवसाय सुरू करणारे सतीश वाघ यांची कंपनी ५७० कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. सतीश वाघ महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत. सध्या त्यांच्याकडे एकूण १६ कार्स आहेत. या लक्झरी कार्समध्ये लँड रोव्हर आणि लेक्सस सारख्या कार्सचा समावेश आहे. त्यांनी भरपूर संपत्तीही निर्माण केली आहे. सतीश यांच्या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. सतीश यांना आपले जीवन अतिशय साधेपणाने जगायला आवडते.
कंपनीचे नाव सुप्रिया ठेवण्यामागे देखील आहे रोमांचक कथा
सतीश सांगतात की त्यांना नेहमीच चांगली माणसे मिळाली. त्यांना महाराष्ट्र सरकारकडून जमीन घ्यायची होती तेव्हा त्याआधी कंपनीचे नाव देणे आवश्यक होते, त्यांना कोणतेच नाव सुचत नव्हते. मग अचानक एक अधिकारी म्हणाला की तुमचे नाव सतीश आहे, तर मग कंपनीचे नाव सुप्रिया ठेवा. त्या दिवसापासून आजपर्यंत कंपनीचे नाव सुप्रिया आहे आणि हे नाव त्यांच्यासाठी खूप 'भाग्यवान' ठरले.
सुप्रिया लाइफसायन्स प्रबळ सीएसआर उपक्रम राबवते
सतीश शाश्वत व्यवसायाचे तत्त्व स्वीकारत समाजाच्या भल्यासाठी प्रबळ सीएसआर उपक्रम राबवतात. आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीद्वारे सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेड पर्यावरण, शाश्वत विकास, शिक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रात काम करून समाजातील वंचित घटकांना सक्षम बनवत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, कंपनी विविध माध्यमांतून समुदायांची सेवा करत आहे. कंपनीने समाजाच्या भल्यासाठी पायाभूत सुविधा आणि सेवांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 'सतीश वाघ फाउंडेशन'ची स्थापना केली आहे. सतीश वाघ फाउंडेशनने गरजू आणि हुशार मुलांना समान संधी देण्यासाठी शाळांमध्ये खेळांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी संगणक, लॅपटॉप, प्रिंटर इत्यादींचा पुरवठा करते, तसेच अनेकदा शैक्षणिक संस्थांना डिजिटलायझेशनच्या मार्गावर पुढे जाण्यास मदत करत आहे. जागतिक महामारी (कोविड-१९) आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात आलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांनी समाजाला खूप मदत केली आहे. कंपनीने रत्नागिरी, रायगड, मुंबई यांसारख्या जिल्ह्यांतील अनेक रुग्णालये आणि गरजू लोकांसाठी वैद्यकीय सुविधा, तसेच औषधे व उपकरणे यांचीही व्यवस्था केली आहे.
एका वर्षात सीएसआर उपक्रमांवर १० कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे
सतीश हे समाजाच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी सतत कार्यरत आहेत. त्यांनी वर्षभरात १० कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी जिल्हा परिषद शाळांचे नूतनीकरण व देखभालीची जबाबदारी घेतली असून त्यावर एकूण एक कोटी रुपये खर्च झाले आहेत. सुप्रिया लाइफसायन्स नेहमीच वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. कंपनीने ९.१० लाख रुपये किमतीमध्ये ३ प्राणी दत्तक घेतले आहेत आणि २१ लाख रुपयांच्या २ महिंद्रा बोलेरो निओ गाड्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्राणी कल्याणासाठी दान केल्या आहेत. सध्या कंपनीने अभ्यागतांमध्ये वन्यजीवांबद्दल जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य गेटवर ३८ लाख रुपये किमतीचा डिस्प्ले बोर्ड लावण्याचे काम सुरू आहे आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ३४ लाख रुपयांची सफारी व्हॅनही दान केली आहे. ज्याचा वापर वाघ आणि सिंह सफारीसाठी केला जात आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पोलीस इंधन केंद्रावर सुमारे १३ लाख रुपये खर्चामध्ये सोलर पॅनलही बसवण्यात आले आहेत.
सतीश आरोग्याबाबतही सीएसआर उपक्रम राबवतात, तसेच कर्करोग, क्षयरोग (टीबी) आणि किडनीच्या उपचारांसाठी करोडो रुपये खर्च करतात
सतीश वाघ हे आरोग्याबाबत देखील मोठ्या प्रमाणावर काम करतात. कर्करोग, क्षयरोग, किडनीचे आजार इत्यादी जीवघेण्या आजारांवर उपचार करण्यासाठी सीएसआर उपक्रमांतर्गत करोडो रुपये खर्च केले जातात. कर्करोगाच्या उपचारासाठी टाटा हॉस्पिटलला ५० लाख रुपये दान दिले आहेत. वाडिया हॉस्पिटलला क्षयरोगावरील उपचारांसाठी अत्याधुनिक मशीन्सही दान केल्या आहेत. मुंबई पोलिसांना समाजाला चांगली सेवा देता यावी यासाठी कंपनीने १६ लाख रुपये खर्च करून वनराई पोलीस स्टेशनला लॅपटॉप, प्रिंटर, प्रोजेक्टर, डेस्कटॉप, मेगाफोन, स्पीकर, व्हीलचेअर आणि इतर वस्तू दान केल्या आहेत.
No comments:
Post a Comment