Wednesday, 18 July 2018

समज-गैरसमजांच्या कक्षा ओलांडणाऱ्या ‘हडळ’ सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न…



मराठीमध्ये नेहमीच विविधांगी विषयावरआधारित सिनेमे बनत असतात. विनोदी आणिआशयघन सिनेमांच्या तुलनेत उत्कंठावर्धक कथानकअसलेल्या सिनेमांची संख्या कमी असल्याने अशासिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. केवळभारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर अशा सिनेमांचा फार मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच हॉलिवूडपासूनबॉलिवूडपर्यंत आणि मराठीसारख्या प्रादेशिकसिनेसृष्टीमध्येही उत्कंठावर्धक चित्रपट बनत असतात.आता ‘हडळ’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणारआहे.
शीर्षकावरून ‘हडळ’ हा जरी भयपट वाटतअसला तरी हा सिनेमा भयावह नसून क्षणोक्षणी उत्कंठावाढवत समज-गैरसमजांच्या कक्षा ओलांडणारा आहे. ‘आर. डी. फिल्म्स प्रोडक्शन’ अंतर्गत निर्माते राजेश-दिनेश ही जोडी ‘हडळ’ या सिनेमाची निर्मिती करीतअसून राजेश-दिनेश या जोडींचीही पहिलीच मराठीनिर्मिती आहे. दिग्दर्शक राकेश भारद्वाज या सिनेमाचेदिग्दर्शन करणार असून कथा, पटकथा आणिसंवादलेखन राकेश बबन दुर्योधन यांनी केलं आहे. यासिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबईतील माटुंगा येथील स्टेटसहॉटेलमध्ये मोठया थाटात संपन्न झाला. या सोहळयालासुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप, अभिनेत्री स्मिता तांबेयांच्यासह सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळीसहमराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील इतर मान्यवर मंडळीउपस्थित होती.
या सिनेमाची कथा कोकणच्या निसर्गरम्य भूमीतघडणारी आहे. या सिनेमात प्रेक्षकांना आवडणारंसारंकाही आहे. कोकणाचं निसर्गसौंदर्य आहेच, पण त्याजोडीला एक सशक्त कथानकही आहे. त्याला श्रवणीयसंगीताची किनार जोडण्यात येईल. याला विनोदाचीझालरही आहे, त्यामुळे  सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठीहा सिनेमा मनोरंजनाचं प्याकेज ठरेल असे दिग्दर्शकराकेश भारद्वाज तसेच राजेश आणि दिनेश या निर्मातेद्वयींचं म्हणणं आहे.
मिलिंद शिंदे, संजय खापरे, विद्याधर जोशी, वर्षाधांदळे, अशोक कुलकर्णी, अभिषेक भामरे आदीकलाकार या सिनेमात मुख्यभूमिकेत दिसणार आहेत.नजीर खान या सिनेमाचे सिनेम्या टोग्राफर आहेत. याचित्रपटातील गीते सावतागवळी यांची असून संगीतकारसंदिप डांगे या गीतांना संगीतबद्ध करणार आहेत. कुमारनीरज या सिनेमाचे संकलक असून समीर शिंदे कार्यकारीनिर्माते आहेत. देवेंद्र तावडे यांनी प्रॉडक्शन डिझाईनकेलं असून मेराज शेख प्रॉडक्शन मनेजर आहेत.मेकअप विजय पंडित, केशभूषा अपर्णा जाधव तसेचअतुल मर्चंडे प्रॉडक्शन कंट्रोलर अशी श्रेय नामावलीआहे.

No comments:

Post a Comment

Sidharth’s Solo Show by Aura Art, at Jehangir Art Gallery (November 4-10, 2025)

MUMBAI, 5 NOVEMBER, 2025 (HNS): Aura Art presents ‘Fables of the Fabulous’, a Solo Show of Paintings and Sculptures by Sidharth, from Novem...