Monday, 2 July 2018

*’परफ्युम’चं टीजर पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच* ~ सप्टेंबरमध्ये चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला


परफ्युम असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटाची चित्रपटसृष्टीत चर्चा आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. चित्रपटाच्या नावासारखंच हे पोस्टरही व्हायब्रंट आहे.
सायकलवर बसून एकमेकांच्या हातात हात असलेलं कपल या पोस्टरमध्ये दिसत आहे. रंगांची मुक्त उधळण असलेल्या या पोस्टरमधून चित्रपटाची कथा ही विविधरंगी आहे, हे व्यक्त होतं. त्यामुळे प्रेमाचे, नात्यांचे, तरुणाईच्या मानसिकतेचे पदर उलगडून दाखवणाऱ्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल ही जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
“हलाल”सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच आगामी “लेथ जोशी” चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे स्टुडिओजचे अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनीच “परफ्युम”ची प्रस्तुती केली आहे तर एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे
दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. ओंकार आणि मोनालिसासह अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत.

No comments:

Post a Comment

Sidharth’s Solo Show by Aura Art, at Jehangir Art Gallery (November 4-10, 2025)

MUMBAI, 5 NOVEMBER, 2025 (HNS): Aura Art presents ‘Fables of the Fabulous’, a Solo Show of Paintings and Sculptures by Sidharth, from Novem...