Friday 17 January 2020

कर्मयोद्धा ग्रंथ: सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनावर आधारित

Shri Prashant Karulkar and Smt. Sheetal Karulkar being felicitated by Respected Home Minister of India, Shri. Amit Shah at the book launch of Karmayoddha- Photo By Sachin Murdeshwar


नवी दिल्ली, 17 जानेवारी, 2020 :  नवी दिल्ली येथे “कर्मयोद्धा ग्रंथ” चा प्रकाशन सोहळा संपन्न झाला असून या पुस्तकात सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनावर दृष्टिक्षेप टाकण्यात आला. कर्मयोद्धा ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी भारताचे गृहमंत्री माननीय अमित शहा उपस्थित होते. तसेच यावेळी भारतातील अनेक दिग्गज आणि नामांकीत नेतेमंडळी हजर होती. या अद्वितीय ग्रंथसंपादनात प्रशांत कारूळकर यांचे महत्त्वाचे योगदान लाभले. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीचा सन्मान तसेच गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांत केलेल्या सामाजिक कार्याची दखल म्हणून त्यांच्या पत्नी शीतल कारूळकर यांच्यासमवेत अमित शहा यांच्या शुभहस्ते दांपत्याचा सत्कार करण्यात आला.
या ग्रंथात श्री. नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्वसामान्य माणसाचा उद्धार करण्यासाठी कशापद्धतीने आपले स्वत:चे जीवन सार्वजनिकरीत्या समर्पित केले याविषयीचा धांडोळा मांडला आहे. या पुस्तकात भारत सरकारचे नामांकीत नेते आणि मंत्री यांनी लिहिलेले लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, नीतीन गडकरी, डॉ. हर्षवर्धन, विजय रुपानी आणि रमेश पतंगे यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.
या ग्रंथात ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्यांचे अमित शहा यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रामुख्याने कारूळकर प्रतिष्ठानामार्फत प्रशांत कारूळकर आणि त्यांची पत्नी शीतल कारूळकर यांनी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून गुजरात आणि महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या अनेक कुटुंबांकरिता रोजगाराच्या संधींची निर्मिती करण्यात आली. 
श्री. प्रशांत कारूळकर हे समाज सुधारणेचा वसा घेतलेले सुधारक असून ते एक प्रसिद्ध राजकीय विश्लेषक आणि लेखकही आहेत. ते आणि त्यांची पत्नी शीतल कारूळकर, हे दोघे समाजातील मागासवर्गीय घटकाच्या कल्याण आणि शिक्षणाला समर्पित असलेल्या बिनसरकारी कारूळकर प्रतिष्ठानाशी संलग्न आहेत. कारूळकर कुटुंबीयांनी 1969 मध्ये या संस्थेची स्थापना केली. त्याकरिता कोणत्याही बाह्य स्त्रोताकडून दान किंवा आर्थिक मदत न घेता या संस्थेच्या माध्यमातून 3000 हून अधिक कुटुंबाना लाभ झाला आहे. ही संस्था शिक्षण, रोजगार आणि पर्यावरण क्षेत्रात आपले अर्थवाही भूमिका बजावताना दिसते. 
यापूर्वी मागील वर्षी “योगग्रंथ” शीर्षकाच्या पुस्तकाकरिता दिलेल्या योगदानाबद्दल तसेच या दाम्पत्याने सामाजिक-आर्थिक सुधारणेत दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून प्रशांत आणि शीतल कारूळकर यांचा सत्कार आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे करण्यात आला होता. त्याप्रसंगी भारताचे राष्ट्रपती वेंकय्या नायडू यांची विशेष उपस्थिती लाभली. 
यापूर्वी प्रशांत कारूळकर यांनी कारूळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून बजावलेल्या सामाजिक कार्यासाठी श्री. नीतीन गडकरी, इंद्रेश कुमार (मार्गदर्शक, मुस्लिम राष्ट्रीय मंच (एमआरएम) आणि उज्ज्वल निकम (सरकारी वकील) अशा दिग्गजांनी त्यांचे कौतुक केले आहे. 

No comments:

Post a Comment

श्रीरंग बारणेंनासाठी राष्ट्रवादीची जंगी सभा : सुधाकर घारेंच्या नेतृत्वात रॉयल गार्डनचे सभागृह झाले हाऊसफुल

मुंबई, 4  मे 2024 (HPN):  सुधाकर घारेंनी महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम करायचा आपला शब्द पाळत शुक्रवारी कर्जत खालापूर मतदारसंघात मावळचे उमेदवा...