Thursday, 27 February 2020

गुरुहरी काकाजी महाराज ध्यान-योग उद्यान येथे चिंतामणी ध्यानाचा कार्यक्रम संपन्न


स्वामीनारायण मंदिर, औरंगाबाद:
चिंतामणी ध्यान योगी डिव्हाईन सोसायटी संचलित हिरण्यनगर, उल्कानगरी स्थित गुरुहरी काकाजी महाराज ध्यान-योग उद्यान येथे 23-02-2020 रोजी चिंतामणी ध्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात श्री गजानन भाई केचे यांनी सुमधुर आवाजात गायलेल्या स्वामीनारायण भजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश भाई मुळे यांनी केले.
कार्यक्रमास मार्गदर्शन करताना अक्षरधाम, स्वामीनारायण मंदिर, पवई, मुंबई येथील गुरुहरी परमपूज्य भरतभाई म्हणाले, “ध्यानाचे (लक्ष) अनेक प्रकार आहेत. लहान सहान गोष्टीत, प्रसंगात प्रत्येकाला ध्यान द्यावे लागते. उदाहरणार्थ स्वयंपाक करताना, गाडी चालविताना इ. महाध्यान म्हणजे भगवंताचे स्मरण. स्मरण करून  ध्यान करणे. ध्यान करताना भगवंताशी  मन जोडणे किंवा भगवंताची मूर्ती, शृंगार, लीला व क्रिया यांचे ध्यान केले तर मन निर्वासनिक होते, म्हणजे मनातील वाईट विचार नष्ट होतात.
गुरुहरी परमपूज्य वशीभाई यांनी चिंतामणी ध्यानाचे सविस्तर विश्लेषण केले. निश्कुलानंद स्वामींनी “हरीस्मृति” नावाचे पुस्तक स्वामीनारायण भगवंतावर लिहिले. त्यात त्यांनी म्हटले आहे, तुम्ही ज्या देवाला किंवा गुरूला मानता त्याच्या स्मृती सोबत स्वामीनारायण मंत्राचा उच्चार करून ध्यान केले तर आपल्या मनातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळते. निश्कुलानंद स्वामींनी पुस्तकांत चिंतामणी ज्ञानाचे १) मूर्ती चिंतामणी २) सुख चिंतामणी ३) महात्म चिंतामणी ४) दर्शन चिंतामणी ५) लीला चिंतामणी ६) थाळ चिंतामणी ७) स्वरूप चिंतामणी हे प्रकार सांगितले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण अतिशय सुबक अशी श्री निळकंठ वर्णी महाराजांची मूर्ती ठरली. सोबतच निळकंठ वर्णीची छोटीशी व्हिडीओ क्लिप दाखविण्यात आली. वडाच्या झाडाखाली विराजमान झालेली निळकंठ वर्णी महाराजांची सुबक आणि बोलकी मूर्ती पाहिली तर दोन मिनिटे मन स्तब्ध होऊन मनाला शांती मिळते, असे अनुभव अनेकांनी सांगितले. कार्यक्रमास नगरसेवक दिलीप थोरात, सुरेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यास सर्व भक्तांनी हातभार लावला.

No comments:

Post a Comment

Infosys promoter Shreyas Shibulal sells nearly 20 lakh shares for ₹317 crore

I n a letter to the BSE, Shreyas disclosed that he sold approximately 19.93 lakh shares in the open market on Wednesday and Thursday, at pri...