Friday, 16 June 2023

रेनॉल्ट इंडियाने 10,00,000 उत्पादनाचा टप्पा गाठला



मुंबई
, 16 जून 2023 (HPN):- रेनॉल्ट, भारतातील आघाडीचा युरोपियन ब्रँडनी, भारतात 10,00,000 वाहनांचा टप्पा गाठला. ही उल्लेखनीय कामगिरी रेनॉल्टच्या उत्पादन कौशल्याचे प्रदर्शन करते आणि भारतीय ग्राहकांना उच्च-गुणवत्तेची वाहने पुरवण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते.

चेन्नईतील रेनॉल्टच्या अत्याधुनिक उत्पादन कारखान्याने या उल्लेखनीय यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रतिवर्षी 4,80,000 युनिट्सची निर्मिती करण्याची क्षमता असलेली ही सुविधा रेनॉल्टच्या उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेची साक्ष आहे. कंपनीने उत्पादन, तंत्रज्ञान आणि मानवी संसाधनांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे आणि उत्पादनासाठी एक मजबूत पायाभूत सुविधा निर्माण केली आहे, जी गुणवत्ता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानके सुनिश्चित करते. रेनॉल्ट-निसान युतीने सहा उत्पादनांच्या विकासासाठी 5,300 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे.

बहु-स्तरीय पुरवठादार आणि डीलर्सच्या मोठ्या इकोसिस्टमसह रेनॉल्टच्या उत्पादन सुविधेने अर्थव्यवस्था, समाज आणि राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारत सरकारच्या मेक-इन-इंडियाच्या संकल्पनेनुसार, कंपनीने गेल्या काही वर्षांत आपली निर्यात मजबूत केली आहे. सध्या, रेनॉल्ट इंडिया भारतातील आपल्या ग्राहकांसाठी लोकप्रिय क्विड, कायगर आणि  ट्राइबर यासह तीन प्रवासी वाहन मॉडेल्स ऑफर करते आणि सार्क, आशिया पॅसिफिक, हिंद महासागर क्षेत्र, दक्षिण आफ्रिका आणि पूर्व आफ्रिका क्षेत्रातील 14 देशांमध्ये निर्यात करते.

रेनॉल्ट इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममिल्लापल्ली यांच्या मते, भारतात 10,00,000 वाहनांचे उत्पादन साध्य करणे हा रेनॉल्टसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे भारतीय बाजारपेठेप्रती आमची अतूट बांधिलकी आणि आमच्या ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास दर्शवते.या अविस्मरणीय प्रवासात योगदान देणारे आमचे ग्राहक, डीलर भागीदार, कर्मचारी आणि सर्व भागधारकांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. आम्ही उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहू आणि आमच्या ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त उत्कंठावर्धक उत्पादने सादर करू.”Ends

No comments:

Post a Comment

Infosys promoter Shreyas Shibulal sells nearly 20 lakh shares for ₹317 crore

I n a letter to the BSE, Shreyas disclosed that he sold approximately 19.93 lakh shares in the open market on Wednesday and Thursday, at pri...