मुंबई, जून २१, २०२३ (HPN)- मुंबई सेंट्रलमधील वोक्हार्ट हॉस्पिटलने डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी संगीत योग सत्रचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. संगीत व व्यायामाच्या माध्यमातून शरीराचे आरोग्य निरोगी ठेवणे व लोकांचे एकंदरितच विकास-कल्याण करणे हा या अनोख्या योगाभ्यासाच्या प्रकाराचा उद्देश आहे.
योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांना पुनरुज्जीवित करणारा एक शक्तिशाली सराव असल्याचे फार पूर्वीपासूनच ओळखले जाते. एखाद्याच्या आरोग्यावर योगाभ्यासामुळे खोलवर होणाऱ्या सकारात्मक परिणामांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एक आठवण म्हणून दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. भारतातील ५ हजार वर्षांच्या इतिहासासह, योगमध्ये मानसिक- शारीरिक आणि आध्यात्मिक पैलूंचा समावेश आहे, ज्याद्वारे व्यक्तींना चांगले जीवन जगण्यासाठी आंतरिक शांतता, आत्मविश्वास आणि धैर्याचा मार्ग मिळतो.
वोक्हार्ट हॉस्टिपलचे सेंट्रल हेड डॉ. वीरेंद्र चौहान यांच्या मते, "योग ही आपली प्राचीन संस्कृती आहे. यातून आपले मन, शरीर, विचार आणि कृती यांच्यात एकात्मता दिसून येते. जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आम्ही वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथे डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या सर्वांगीण विकास व कल्याणासाठी संगीत योगचे आयोजन केले. अन्य कोणत्याही गोष्टींपेक्षा आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे, याची जाणिव आम्हाला आहे आणि म्हणूनच योगाभ्यासाच्या माध्यमातून स्वतःच्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी दिवसातून थोडा वेळ काढणे आवश्यक आहे."
सर्व वयोगटातील लोकांसाठी संगीत योगचे आयोजन करण्यात आले आहे. या योगाभ्यासाद्वारे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य निरोगी राहण्यास सराव करण्यात आला, ज्यामुळे शरीराची ताकद, सहनशक्ती आणि चपळता सुधारण्यास मदत मिळते. शरीरास कोणतीही इजा पोहोचणार नाही, याची दक्षता घेऊन संगीत व व्यायामाची सांगड घालून निवडक योगाभ्यासाचा समावेश करण्यात आला, या सरावामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास, वजन कमी होण्यास, शरीर लवचिक होण्यास आणि मानसिक आरोग्यासही अनेक लाभ मिळण्यास मदत मिळते.
प्रख्यात योग थेरपिस्ट वृंदा ठक्कर (B.A. In Yoga) यांनी. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी योगाभ्यासाचे एक तासाचे सत्र आयोजित केले. यादरम्यान त्यांनी सांगितले की, "संगीत आणि नृत्य हे तणाव कमी करण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे आणि बहुतांश सर्वच लोकांना संगीत-नृत्याची आवड असते. आपल्या दिनचर्येत संगीत व नृत्याचा समावेश केल्यास हृदयाच्या गतीत संतुलन राखण्यास तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासही मदत मिळू शकते. चयापचयाच्या क्रियेसाठीही संगीत योग फायदेशीर ठरतो."
संगीत योगाभ्यासाचे फायदे खालील प्रमाणे :
● शरीर शिथिल होण्यास मदत मिळते
● योग्य संगीताची निवड केल्यास शरीराचा तणाव कमी होतो
● मानसिक सतर्कता आणि सकारात्मक मानसिकता वाढवते
● संगीतामुळे श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत योग्य संतुलन राहते, आसनांचा सराव सहज-सुलभ होतो
● शारीरिक, आध्यात्मिक आणि मानसिक आरोग्य सुधारते
● शरीराची लवचिकता वाढते
● शरीराच्या स्नायूंची ताकद वाढवते
● शरीराची श्वसन प्रक्रिया, ऊर्जेची पातळी आणि चैतन्य वाढवते
● शरीराचे सर्व कार्य योग्य पद्धतीने होण्यासाठी चयापचय प्रक्रिया योग्य पद्धतीने नियंत्रित करते
● वजन कमी होण्यास मदत मिळते
● हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य निरोगी राहते
● रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्यास इजा होण्याचा धोका कमी करते
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संगीत योगची परिवर्तनीय शक्ती आत्मसात करून, आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक सर्वांगीण विकास व कल्याणाचा प्रसार केल्याबाबत मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला अभिमान आहे. आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य व आनंदाची वृत्ती अधिकाधिक वाढवणे, हे हॉस्पिटलचे मुख्य उद्दिष्ट आहे.
No comments:
Post a Comment