Monday, 28 August 2023

ब्लू डार्ट जाहीर करत आहे राखी एक्स्प्रेस ऑफर


मुंबई
ऑगस्ट, 2023 (हिंदमाता वार्ताहर) : ब्लू डार्ट या भारतातील आघाडीची एक्स्प्रेस लॉजिस्टिक्स सर्व्हिस प्रोव्हायडरने तसेच डीएचएल ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीनेयंदाच्या सणासुदीच्या काळात भावंडांमधील नात्यांचे बंध जोपासण्यासाठीआपली वार्षिक राखी एक्स्प्रेस ऑफर पुन्हा आणत असल्याची घोषणा केली आहे.  या ऑफरद्वारे ग्राहक राख्या आणि भेटवस्तू सवलतीच्या दरात पाठवू शकतीलदेशभरात कोठेही 0.50 किलोग्रॅम वजनाचे पार्सल 250 रुपयांत पाठवण्याची सवलत ब्लू डार्ट ग्राहकांना देत आहेशिवाय, 0.50  ते 20 किलो वजनाच्या आंतरराष्ट्रीय शिपमेंट्सच्या मालवाहतुकीवरही ग्राहकांना 50 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणाआहेही ऑफर 31 ऑगस्ट 2023पर्यंत लागू आहे.  

सण साजरा करण्याचा एक भाग म्हणूनया ऑफर कालावधीतदेशांतर्गत राखी पाठवणाऱ्या ग्राहकांना स्लोगन काँटेस्टमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहेया स्पर्धेत भाग घेण्यासाठीग्राहकांना एक फॉर्म भरावा लागेल आणि आमच्या कुटुंबाला ब्लूडार्टची राखी एक्स्प्रेस सेवा खूप आवडते कारण, … हे साधे घोषवाक्य पूर्ण करावे लागेलसर्व प्रवेशिकांमधील पहिल्या 50 उत्तरांना रोमांचक बक्षिसे दिले जातील आणि राखीपौर्णिमेचा सणअधिक स्मरणीय केला जाईल.   

ब्लू डार्टचे चीफ कमर्शिअल ऑफिसर केतन कुलकर्णी या ऑफरबद्दल म्हणाले, “विशेष सणांसाठी पाठवल्या जाणाऱ्या प्रत्येक शिपमेंटचे भावनिक मूल्य आम्हाला समजतेमग ती शिपमेंट छोटी असो किंवा मोठीसणासुदीच्या काळातील एक्स्प्रेस (वेगवानडिलिव्हरीचे महत्त्व लक्षात घेऊन आम्ही राखी एक्स्प्रेस ऑफर सुरू केली आहे आणि दरवर्षी ती पुन्हापुन्हा देत राहतोया काळात देशभरातून येणाऱ्या ऑर्डर्सच्या संख्येमध्ये सातत्याने अनेक पटीने वाढ होताना आम्हाला दिसत आहेप्रत्येक डिलिव्हरी अत्यंत काळजीपूर्वक हाताळली जाईल  वेळेवर पोहोचवली जाईल याची काळजी घेण्यासाठी आणि त्याद्वारे ग्राहकांना एक अखंडित अनुभव पुरवण्यासाठी ब्लू डार्ट बांधील आहे." 

प्रतिष्ठित डीपीडीएचएल ग्रुपचा भाग असलेल्या ब्लू डार्टचे विस्तृत जाळे भारतातील  जगभरातील 220 देश-प्रदेशातील 55,000हून अधिक ठिकाणी पसरले आहेराखी एक्स्प्रेस ऑफर सोयीस्कर संपर्करहित डिलिव्हरी अनुभवासह दिली जात आहेनेट बँकिंगक्रेडिट  डेबिट कार्ड्सभारत क्यूआर कोड आणि यूपीआय (भिमअशा डिजिटल पेमेंटच्या सोळा पर्यायांपैकी कोणताही निवडून ग्राहक त्याद्वारे सहज पेमेंट करू शकतात.    

या सुखद ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहक नजीकच्या ब्लू डार्टकाउंटरला भेट देऊ शकतातwww.bluedart.com या वेबसाइटवर जाऊ शकतात किंवा अॅपल स्टोअर  प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले माय ब्लू डार्ट मोबाइल अॅप्लिकेशन वापरू शकतातपुढील चौकशीसाठी किंवा ब्लू डार्ट सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी ग्राहक 1860 233 1234 या कस्टमर  केअर  क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा customerservice@bluedart.com यावर मेल पाठवू शकतातहे रक्षाबंधन तुमच्यासाठी प्रेमजिव्हाळ्याने भरलेले असो आणि ब्लू डार्टद्वारे दिला जाणारा अखंडित डिलिव्हरीचा अनुभव तुम्हाला ह्यानिमित्ताने मिळो.Ends

 

No comments:

Post a Comment

Singapore-based sovereign wealth fund GIC subsidiary’s Gamnat Pte Ltd and Promoter Sunu Mathew lead Rs 371.3 crore investment in Leap India in Pre-IPO round

MUMBAI, NATIONAL, AUGUST 6, 2026 | HPN – Leap India (formerly known as Leap India Private Limited) (the “Company”), the largest on-demand a...