Friday, 25 August 2023

रेनॉकडून सर्वोत्तमतेला पुनर्परिभाषित करत एका आठवड्यात पाच डिलरशिप्‍सचे उद्घाटन


रेनॉचे गोव्‍यामध्‍ये दुहेरी लाँच आणि छत्तीसगडमध्‍ये तिहेरी सादरीकरण ग्राहक अनुभवामध्‍ये वाढ करतील 

मुंबई, ऑगस्‍ट २५, २०२३ (हिंदमाता वार्ताहर): रेनॉ इंडिया या भारतातील आघाडीच्‍या युरोपियन ब्रॅण्‍डने एका आठवड्यात पाच नवीन अत्‍याधुनिक डिलरशिप्‍स व वर्कशॉप्‍सच्‍या उद्घाटनाची अभिमानास्पद घोषणा केली. बहुमूल्‍य ग्राहकांना अपवादात्‍मक सेवा व अनुभव देण्‍याप्रती कंपनीच्‍या कटिबद्धतेमधील हे मोठे पाऊल आहे. ग्राहक समाधान व उपलब्‍धतेवर अविरत लक्ष केंद्रित करत रेनॉ इंडियाने आपल्‍या नेटवर्कमध्‍ये वाढ करणे सुरू ठेवले आहे. हे नेटवर्क आता गोव्‍याच्‍या वैविध्‍यपूर्ण ठिकाणी आणि छत्तीसगडच्‍या नयनरम्‍य ठिकाणी उपस्थित आहे. 

गुंतवणूकदारांचा विश्‍वास संपादित करण्‍यासह भारतीय बाजारेपठेवरील अधिक फोकसला सादर करणारी रेनॉची कटिबद्धता आणि भारतातील गुंतवणूकीप्रती बांधील राहत रेनॉ इंडियाने मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीने नुकतेच गोव्‍यामधील पणजी, मडगाव व वरणा या वैविध्‍यपूर्ण ठिकाणी दोन शोरूम्‍स व वर्कशॉप्‍सचे उद्घाटन केले आहे. या विस्‍तारीकरणामधून रेनॉची प्रदेशामधील उपस्थिती अधिक दृढ होते, ज्‍यामुळे ग्राहकांना रेनॉच्‍या वेईकल्‍सच्‍या नाविन्‍यपूर्ण लाइन-अपचा शोध, अनुभव घेता येतो व मालकीहक्‍क प्राप्‍त होतात, तसेच उच्‍चस्‍तरीय सर्विस व सपोर्ट मिळतो. 

तसेच, रेनॉ इंडियाने छत्तीसगडमधील संपन्‍न शहरे बिलासपूर, अंबिकापूर व कोरबा येथे तीन शोरूम्‍स व वर्कशॉप्‍स लाँच केले आहेत. अद्वितीय सोयीसुविधा व कस्‍टमर केअर देण्‍याप्रती कटिबद्ध असण्‍यासह ही नवीन केंद्रे ग्राहकांना रेनॉ ब्रॅण्‍डशी कनेक्‍ट होण्‍यामध्‍ये आणि त्‍यांच्‍या अनेक ऑफरिंग्‍जचा लाभ घेण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी हब्‍स म्‍हणून सेवा देण्‍यास सज्‍ज आहेत. 

रेनॉ इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (आरआयपीएल) येथील सेल्‍स मार्केटिंगचे उपाध्‍यक्ष श्री. सुधीर मल्‍होत्रा या विस्‍तारीकरणाबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ''या पाच नवीन डि‍लरशिप्‍स व वर्कशॉप्‍सच्‍या उद्घाटनामधून रेनॉची उत्‍पादने व सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचण्‍याप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. ही नवीन केंद्रे दर्जात्‍मक ग्राहक अनुभव देण्‍याप्रती आमची समर्पितता अधिक दृढ करतात, तसेच त्‍यामधून ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजा व महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्‍याप्रती आमचे सुरू असलेले प्रयत्‍न दिसून येतात.'' 

रेनॉ इंडियाचा विस्‍तारीकरण दर्जा व ग्राहक समाधानाच्‍या उच्‍च मानकांची पूर्तता करणाऱ्या सर्वसमावेशक विक्री-पश्‍चात्त सेवांसह वेईकल्‍सची श्रेणी उपलब्‍ध करून देण्‍याप्रती असलेल्‍या कंपनीच्‍या मिशनशी संलग्‍न आहे. धोरणात्‍मक ठिकाणी उद्घाटन करण्‍यात आलेल्‍या या नवीन डि‍लरशिप्‍स व वर्कशॉप्‍समधून खात्री मिळते की, गोवा व छत्तीसगडमधील ग्राहकांना रेनॉच्‍या ऑफरिंग सुलभपणे उपलब्‍ध होतील, तसेच अधिक सर्वोत्तम व उत्‍साहपूर्ण मालकीहक्‍क प्रवासाचा आनंद मिळेल.          

रेनॉ आपल्या उत्पादन विस्ताराच्या धोरणासह भारतात मोठ्या प्रमाणावर गाड्या देण्याच्या योजनेद्वारे भारतात आपली नेटवर्कची पोहोच वाढवत आहे आणि ग्राहकांना रेनॉ ब्रॅण्‍डसोबत अभूतपूर्व पद्धतीने जोडले जाता येईल, याची खात्री करण्यासाठी अनेक विशेष आणि नवनवीन उपक्रम हाती घेत आहे. सध्या रेनॉ इंडियाचे भारतात ४५० पेक्षा जास्त विक्री आणि ५०० हून अधिक सेवा टचपॉइंट्स आहेत आणि त्यात देशभरातील २३० पेक्षा जास्त वर्कशॉप ऑन हील्स लोकेशन्सचा समावेश आहे.

------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

न्‍यूगो च्या E-K2K इलेक्ट्रिक बस मोहिमेला ‘'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'’ कडून दुहेरी मान्यता मिळाली

मुंबई, 31डिसेंबर 2024 (HNS): ग्रीनसेल मोबिलिटी ची भारतातील सर्वात मोठी इंटरसिटी इलेक्ट्रिक बस सेवा न्‍यूगो च्या इलेक्ट्रिक बसने काश्मीर ते ...