Tuesday, 29 August 2023

डाऊन सिंड्रोम रुग्णावर वोक्हार्ट हॉस्पिटल्स मध्ये यशस्वी हिप रिप्लेसमेंट सर्जरी


मुंबई, २९ ऑगस्ट,२o२३ (हिंदमाता प्रतिनिधी) :-
कोविड-19 नंतर भारतामध्ये अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस(AVN) चे प्रमाण वाढत आहे.रुग्णांची अचानक वाढ होण्यामागे काही गोष्टी कारणीभूत आहेत. लॉकडाऊन काळामध्ये अनेकांच्या शरीराची हालचाल कमी झाली होती. शरीराचे चलनवलन नसणे हा अव्हॅस्क्युल रनेक्रोसिसचा त्रास होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण होतं. ताण-तणावामुळेही परिस्थिती आणखीनच चिंताजनक बनत गेली. लॉकडाऊनच्या काळात बहुसंख्य लोकांना बैठी जीनवशैली स्वीकारावी लागली होती. ती अंगवळणी पडल्याने त्याचा परिणाम हाडांच्या मजबुतीवर होऊ लागला. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसला ऑस्टिओ नेक्रोसिस असंही म्हणतात. यात हाडाला होणाऱ्या रक्तपुरवठ्याला बाधा निर्माण होते ज्यामुळे हाडातील ऊती मृत होतात. मांडीचे सांध्याचे हाड हे खुब्याच्या सांध्याचा एक महत्त्वाचा भाग असतं. या हाडाला अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसमुळे जास्त हानी पोहचत आहे. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसमुळे रुग्णाला खूप त्रास होतो. वेदना, सांधेदुखी ही सहन करण्यापलिकडे गेल्याने शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरत नाही. पूर्वी अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसमुळे त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या ही फारच कमी होती. मात्र कोविड-19 च्या लाटेनंतर ही परिस्थिती बदलली असून ही बाब चिंताजनक आहे. डॉ. सुप्रीत बाजवा, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील ऑर्थोपेडिक सर्जन सांगतात कि आमच्या वोक्हार्ट हॉस्पिटल मध्ये अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस च्या त्रासाने ग्रस्त मिनेश गोगलाणी (वय 32)तरुण रुग्ण आला होता. त्याला डाऊन सिंड्रोम (गतिमंदता) होता. डाऊन सिंड्रोम ही स्थिती त्या व्यक्तीच्या गुणसुत्रीय असंतुलनामुळे तयार होते. या रुग्णावर टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजेच संपूर्ण खुब्याचा सांधा बदल शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. डाऊन सिंड्रोम असलेल्या रुग्णावर असे उपचार करणे हे एक मोठे आव्हान होते. डाऊन सिंड्रोम असलेल्या रुग्णावर डायरेक्ट अँटेरिअर पद्धतीने केलेली ही शस्त्रक्रिया एक गेमचेंजर ठरली आहे. वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत, सुधारणा होत आहेत. डायरेक्ट अँटेरिअर पद्धती वापरून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांमुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची आशा निर्माण होते. लवकर बरे होणे, रुग्णाचे समाधान होणे, कमी खर्च यासारखे बरेच फायदे या शस्त्रक्रियेमुळे होतात. कोरोनानंतरच्या परिस्थितीमुळे रुग्णांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानक्षेत्रात नावीन्यपूर्ण उपचारपद्धती आल्या आणि त्या वैद्यकीय क्षेत्राने स्वीकारल्या. डायरेक्ट अँटेरिअर शस्त्रक्रिया ही देखील याच उपचार पद्धतींपैकी एक आहे.

No comments:

Post a Comment

न्‍यूगो च्या E-K2K इलेक्ट्रिक बस मोहिमेला ‘'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'’ कडून दुहेरी मान्यता मिळाली

मुंबई, 31डिसेंबर 2024 (HNS): ग्रीनसेल मोबिलिटी ची भारतातील सर्वात मोठी इंटरसिटी इलेक्ट्रिक बस सेवा न्‍यूगो च्या इलेक्ट्रिक बसने काश्मीर ते ...