मुंबई, 10 ऑक्टोबर, 2023 (HPN)– खासगी ब्रँडवर सतत लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगाने; या मोसमात, शॉपर्स स्टॉपने त्यांच्या दिवाळी कॅम्पेनसोबत 'त्योहर की नई कशिश' या नवीन कशिश कलेक्शनचे अनावरण केले आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येकाला नवीन अनुभव आणि परंपरा आत्मसात करण्यासाठी प्रेरित करणे हा या कॅम्पेनचा उद्देश आहे.
सान्या मल्होत्रा नावीन्य आत्मसात करण्याच्या भावनेला मूर्त रूप देते. तिचे अष्टपैलुत्व आणि नवीन दृष्टीकोन काहीतरी नवीन आणि हटके करण्याचा प्रयत्न कॅम्पेनच्या विचाराशी पूर्णपणे जुळणारा आहे. सिनेमा या माध्यमातून, सान्याचा मंत्र कायमच सणासुदीत काहीतरी नवीन आणण्याचा राहिला आहे, दिवाळी हा सण शुभारंभ आणि मनमोहक क्षणांचा काळ आहे. या कल्पनेला साजेसे “इस बार कुछ नया करते हैं!” सुचवून सान्या पारंपरिक दिवाळी साजरी करण्यासाठी एक नवीन दृष्टीकोन सादर करते. दिवाळी म्हणजे केवळ एक सण नसून, नवीन आरंभ आणि मनमोहक क्षणांचा कॅनव्हास असल्याची स्मरण करून देणारी, प्रत्येकाला नवीन कल्पना आणि अमर्याद सर्जनशीलतेच्या उत्सवात सामील होण्यासाठी आमंत्रित करणारी सुरुवात आहे."
शॉपर्स स्टॉपच्या कस्टमर केअर असोसिएट अँड मार्केटिंग आणि कम्युनिकेशनच्या प्रमुख सुश्री श्वेतल बसू म्हणाल्या, "शॉपर्स स्टॉपमध्ये, आम्ही नेहमी आमच्या ग्राहक अनुभवात भर घालण्याचा आणि त्यांना काहीतरी खास देण्याच्या प्रयत्नांत असतो. 'त्योहर की नई कशिश' हे आमचे कॅम्पेन आहे. जीवनाचा मनसोक्त उत्सव, खास दिवाळी क्षणांची एक हृदयस्पर्शी आठवण आणि प्रत्येक प्रसंगाला विशेष स्पर्श कसा करावा याबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शक. आमचे अगदी नवीन उत्सव संग्रह दिवाळीला खऱ्या अर्थाने खास बनवणाऱ्या आनंददायक क्षणांचा सन्मान करण्यासाठी काळजीपूर्वक क्युरेट करण्यात आले आहेत, प्रत्येक धाग्यात प्रेम आणि एकजुटीचे धागे विणण्यासह लोकांना काहीतरी नवीन करून पाहण्याची प्रेरणा मिळेल.”
या कॅम्पेनवर भाष्य करताना सान्या मल्होत्रा म्हणाली, “सण साजरा करण्याचा विचार परंपरेच्या पलिकडचा आहे; एखादी शैली आत्मसात करणे, खुलून दिसणे आणि आपले सर्वोत्कृष्ट अनुभव घेणे म्हणजे सण साजरा करणे! कशिश दिवाळी कलेक्शनमध्ये परंपरेची कृपा आणि आधुनिक फॅशनचे आकर्षण यांचा सुरेख मेळ आहे. कशिश दिवाळी कॅम्पेन, 'त्योहर की नई कशिश' चा एक भाग बनून राहणे मला रोमांचित करते, ज्यामध्ये सणाची शोभा पुन्हा परिभाषित करतो. आपण आपले सणाभोवतीचे खास क्षण कसे वेगळे बनवू शकतो याचे दर्शन कॅम्पेनमध्ये घडते.”
यंदा दिवाळीत शॉपर्स स्टॉप आणि कशिश यांनी त्यांच्या ग्राहकांकरिता खास फेस्टिव्ह कलेक्शनची निर्मिती केली आहे. कशिश फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये स्टाईलिश आऊटफिट, सर्वोत्तम रंग आणि काळजीपूर्वक निवडलेल्या डिझाईन सादर करण्यात येतात, ज्या फेस्टिव्ह मोसमाकरिता आदर्श ठरतात. अगदी नवीन कशिश कलेक्शनमध्ये क्युरेट करण्यात आलेले आकर्षक पोशाखांत समकालीन शिलाईसह चमकदार सणाच्या रंगात, लक्षवेधी भरतकाम आणि तपशील, सुंदर पारंपरिक पेहराव आणि चमचमते कुर्ते, तुमच्या उत्सवी क्षणांना ग्लॅमर आणि तेजस्वीपणाचे आश्वासन देतात."
कशिश’च्या फेस्टिव्ह कलेक्शनची खरेदी करण्यासाठी तुमच्या नजीकच्या शॉपर्स स्टॉपला भेट द्या किंवा www.shoppersstop.com वर लॉग इन करा.
No comments:
Post a Comment