Friday, 8 December 2023

मुंबई येथील ग्रुप लेग्रँड इंडिया'च्या वतीने 100 कृत्रिम अवयवांचे वाटप




मुंबई
, 08 डिसेंबर, 2023 (HPN): इलेक्ट्रिकल आणि डिजिटल बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा अग्रगण्य पुरवठादार  असलेल्या ग्रुप लेग्रँड इंडियाने रोटरी दिव्यांग सेंटरच्या संयुक्त विद्यमाने मालाडमुंबई येथे कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा उद्देश गतिशीलता वाढवणे तसेच दिव्यांगांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून त्यांचे जीवन सशक्त करणे हा आहे. 

 हे अवयव वाटप शिबीर खासकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता आयोजित करण्यात आले असून कृत्रिम अवयवांची अत्यावश्यक गरज पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या लक्ष्यित दृष्टिकोनाचा उद्देश आमच्या समुदायातील सर्वात असुरक्षित घटकांना सशक्त करणे, त्यांना नूतनीकरण स्वातंत्र्य आणि सुधारित उपजीविकेची संधी प्रदान करण्याचे आहे. यंदा मार्च महिन्याच्या पूर्वार्धात, ग्रुप लेग्रँड इंडियाच्या वतीने ठाणे येथे रोटरी दिव्यांग सेंटरच्या वतीने अशा पद्धतीच्या कृत्रिम अवयव शिबिराच्या माध्यमातून 50 दिव्यांगांचे सबलीकरण करण्यात आले. त्याशिवाय 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून असेच अवयव वाटप शिबीर पॉन्डीचेरी येथील सत्य स्पेशल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. ज्यामध्ये ग्रुप लेग्रँड इंडिया15 वर्षांखालील 27 बालकांना कृत्रिम अवयवांचे वाटप करून साह्य करणार आहे. 

ग्रुप लेग्रँड इंडियाचे सीईओ आणि एमडी श्री टोनी बर्लंड म्हणाले, “आम्ही गरजवंतांच्या जीवनावर अर्थपूर्ण प्रभाव पाडण्याच्या सामायिक वचनबद्धतेने प्रेरित आहोत. ग्रुप लेग्रँड इंडियामध्ये, आमचा नवकल्पना, सर्वसमावेशकता आणि सामाजिक जबाबदारीच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. 100 गरजू व्यक्तींना प्रगत कृत्रिम अवयव उपलब्ध करून, आम्ही केवळ गतिशीलता वाढवत नाही तर आम्ही स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि उज्ज्वल भविष्याला चालना देत आहोत. आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांचे जीवन सुधारण्यासाठी आमचे हे सहकार्य समर्पणाचे प्रतिबिंबित आहे.” 

 ग्रुप लेग्रँड इंडियाने सामाजिक जबाबदार उपक्रमांचा एक भाग म्हणून समाजाचे जीवन सुधारण्याकरिता शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अनेक कार्यक्रमांवर भर दिला आहे. 

No comments:

Post a Comment

Infosys promoter Shreyas Shibulal sells nearly 20 lakh shares for ₹317 crore

I n a letter to the BSE, Shreyas disclosed that he sold approximately 19.93 lakh shares in the open market on Wednesday and Thursday, at pri...