Wednesday, 27 December 2023

Sridevi Prasanna: 'चहा घेणार की कॉफी?'; सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या 'श्रीदेवी प्रसन्न'चं मोशन पोस्टर रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला



मुंबई, 27 डिसेंबर 2023 (HPN):
 Sridevi Prasanna: टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी यांची निर्मिती असलेला "श्री देवी प्रसन्न" (Sridevi Prasanna) हा येत्या 2 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले.


सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर शेअर करणार स्क्रिन


"श्रीदेवी प्रसन्न" या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वासह बॉलिवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि स्मार्ट अँड डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आहे. आजवर अनेक हीट चित्रपट देणारे हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी फुलवणार आहे. या निमित्ताने नव्या वर्षात, एक नवी आणि आगळीवेगळी लव्ह स्टोरी आपल्या लाडक्या जोडीसह प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

'हे' कलाकार साकारणार भूमिका


सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेसह सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वांखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे अशी दमदार कास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे श्रीदेवी आणि प्रसन्न यांच्या लव्हस्टोरी सोबत हा एक कंप्लीट फॅमिली सिनेमा आहे. 

"श्रीदेवी प्रसन्न"  या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे.


सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचे चित्रपट


सिद्धार्थ चांदेकरचा काही दिवसांपूर्वी झिम्मा-2 हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता सिद्धार्थच्या "श्रीदेवी प्रसन्न"  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तसेच सई देखील विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. काही दिवसांपूर्वी तिचा मिमी हा चित्रपट रिलीज झाला होता. आता "श्रीदेवी प्रसन्न"  या चित्रपटात सिद्धार्थ आणि सई यांची जोडी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

No comments:

Post a Comment

संघ के खिलाफ़ आपत्तिजनक टिप्पणी करने वाले बद्रीनारायण तिवारी के खिलाफ कोर्ट पहुंचा स्वयंसेवक

पां‌च दिसंबर को मुम्बई सिविल कोर्ट में प्रीतेश शिवराम मिश्रा ने प्रयागराज स्थित जी बी पंत महाविद्यालय के कुलपति बद्रीनारायण तिवारी के खिलाफ ...