Friday, 12 January 2024

वालचंद पीपलफर्स्ट लिमिटेडचा डेल कार्नेगीच्या नवीन सब-फ्रेंचायजीसह पुणे येथे विस्तार

मुंबई 12 जानेवारी 2024 (HPN): वालचंद पीपलफर्स्ट लिमिटेड हा कार्यालयीन पर्याय क्षेत्रातील आद्यकर्ता असून डेल कार्नेगीसाठी सब-फ्रेंचायजी म्हणून रिसेट लर्निंगची नियुक्ती करून पुणे येथे धोरणात्मक विस्ताराची घोषणा करण्यात आली. बँकिंग उद्योगातील अनुभवी दिग्गज विनोद खोत त्यांच्या दोन दशकांहून अधिक नेतृत्व अनुभवासह रिसेट लर्निंग या नवीन उपक्रमात सहभागी होत आहेत. 


पुणे येथे 2004 मध्ये स्थापना झाल्यापासून डेल कार्नेगी हे नाव उत्कृष्ट व्यावसायिक विकास आणि प्रशिक्षणाला समानार्थी शब्द बनला, ज्याने शहराच्या गतिशील व्यवसाय परिदृश्यावर एक अमीट छाप सोडली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, या संस्थेने बजाज, अल्फा लाव्हा, भारत फोर्ज, गेरा डेव्हलपमेंट्स, पियाजिओ आणि इतर अनेक उद्योग नेतृत्वांसह प्रतिष्ठित ग्राहकांना यशस्वी सहकार्य केले आहे. 

पुण्याला “पूर्वेचे ऑक्सफर्ड” म्हटले जाते आणि हे विविध उद्योगांचे माहेरघर आहे, एक बाजारपेठ म्हणून अतिशय आश्वासक ठरते. शहराच्या बळकट अर्थकारणाला कुशल कर्मचारी वर्गाची जोड असल्याने WPFL'च्या विस्तृत रणनीतिच्या दृष्टीने आदर्श ठिकाण ठरते. व्यावसायिक विकासासाठी पुण्याचे प्रमुख गंतव्यस्थान म्हणून, डेल कार्नेगी व्यावसायिकांची कौशल्ये, दृष्टीकोन आणि क्षमतांना आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे आणि या प्रदेशातील व्यवसायांचे एकंदर यश आणि लवचिकतेमध्ये योगदान देते आहे. 

या विस्ताराबद्दल बोलताना वालचंद पीपलफर्स्ट अँड डेल कार्नेगी ट्रेनिंग इंडिया’चे चेअरपर्सन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पल्लवी झा म्हणाल्या; "रिसेट लर्निंग सोबतची आमची भागीदारी व्यक्ती आणि व्यवसायांना सक्षम बनविण्याच्या आमच्या वचनबद्धतेत लक्षणीय प्रगती दर्शवते. पुणे, त्याच्या गतिमान व्यवसाय परिघासह, विकास आणि उत्कृष्टता वाढवण्याच्या आमच्या ध्येयाशी पूर्णपणे संरेखित आहे. या भागीदारीद्वारे, आम्ही नवीन शक्यतांकरिता उत्सुक आहोत, व्यावसायिक विकासाला चालना देणे, आणि पुण्याच्या दोलायमान कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक प्रभाव निर्माण करणे." 

पुणे येथे रिसेट लर्निंगकरिता आपली दूरदृष्टी विशद करताना विनोद खोत म्हणाले, "आमचे लक्ष्य शहरात डेल कार्नेगी वारसा निर्माण करण्याचे असून व्यक्ती आणि संघटनांच्या व्यावसायिक विकासात योगदान देण्याचे आहे. या भागीदारीच्या माध्यमातून सहकार्य आणि वृद्धी संधींचे आकर्षक पर्याय खुले होतील.” 

या विस्तारामुळे, WPFL ला कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) शिक्षण आणि कौशल्य, मनुष्यबळ सल्लामसलत आणि इतर अनेक बाबींसह वालचंद प्लस कार्यक्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण संधी दिसतात. हे पाऊल WPFL ची सर्वांगीण व्यवसाय विकास बांधिलकी आणि ज्या समुदायांना ते सेवा देतात; त्यांच्यावर सकारात्मक परिणाम निर्मिती प्रतिबिंबित करते आणि कॉर्पोरेट जगाच्या बदलत्या गरजा पूर्ण करणे तसेच उत्कृष्टता आणि निरंतर सुधार संस्कृती सुलभ करण्यासाठी डेल कार्नेगीची परिणामकारकता अधोरेखित करते.

No comments:

Post a Comment

Infosys promoter Shreyas Shibulal sells nearly 20 lakh shares for ₹317 crore

I n a letter to the BSE, Shreyas disclosed that he sold approximately 19.93 lakh shares in the open market on Wednesday and Thursday, at pri...