Sunday, 13 October 2024

लातूरचे चित्रकार अभिजीत बी. लामतुरे यांच्या अमूर्त चित्रांचे प्रदर्शन दि. १४ ते २० ऑक्टोबर, २०२४ दरम्यान, मुंबईच्या हिरजी जहांगीर आर्ट गॅलरीत






मुंबई (प्रतिनिधी):
 शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक मिळवलेल्या लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील कोकळगांव येथील अभिजीत बी. लामतुरे या नवख्या चित्रकाराचे अमूर्त चित्राचे प्रदर्शन मुंबई येथील हिरजी जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी रोड, काळा घोडा, मुंबई येथे दि. १४ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर, २०२४ पर्यंत सकाळी ११ ते सायकाळी ७ या वेळेत सुरु रहाणार आहे. चित्रकार अभिजीत लामतुरे यांचे प्राथमिक शिक्षण नगरपालीका लातूरच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण श्री देशीकेंद्र विद्यालय लातूर, चित्रकलेचे शिक्षण चित्रकला महाविद्यालय लातूर तसेच भारती विद्यापीठ पुणे, अभिनव कला महाविद्यालय पुणे व जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे झाले. 

ज्याला अस्तित्व नाही, त्याची कल्पना करून कॅनव्हासवर चित्रात मांडणे म्हणजे 'अमूर्त कला" अशी व्याख्या करता येते. साधारणत: स्ट्रोक, शेप, संरचना रंगफार्म, उद्देश आणि समझ भिन्न असल्याने त्या चित्रांमध्ये दिसणारे अर्थ असंख्य असतात. मानवी बुद्धीला ज्ञात असलेल्या सर्व आकारांना काहीना काही संज्ञा आहेत. ब्रम्हांडाच्या अवकाशात असंख्य आकार दृश्य स्वरूपात अस्तित्वात आहेत. त्याची उत्पत्ती एका बिंदूपासून अनेक बिंदू एकत्र येवून झालेली आहे. याला संज्ञा नाही. म्हणून अमूर्त आहेत. 

बिंदुपासून जन्माला येणारा महाप्रचंड तारा तुटतो, तेव्हा प्रचंड ऊर्जा उत्सर्जीत करतो, तेव्हा त्याचे कृष्णवीवर तयार होते, हे कृष्णविवर म्हणजे भलामोठा बिंदूतून उत्पन्न झालेला अमूर्त आकार होय. चित्रकार अभिजीत बी. लातूर यांनी पृथ्वी, आप, तेज, वायु, आणि आकाश या पंचमहाभूतांनी - बनलेल्या सौंदर्यसृष्टीतल्या सर्व ज्ञात व अज्ञात आकाराच्या उत्पत्ती मागील मुळ गाभा असलेल्या बिंदूत्वाचा शोध चित्रांमध्ये घेऊन बिंदू, रेषा, आकार, रंग, पोत या पाच तत्वापासून नवनवीन प्रतिमाने निर्माण केलेली आहेत. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव गायतोंडे, प्रभाकर कोलते, अकबर- पदमसी यांचा वसा व प्रेरणा घेवून चित्रकार अभिजीत लामतुरे यांनी ही अमूर्त चित्राकृती साकारली आहे. त्यांचे हे चित्रप्रदर्शन रसिकांना २० ऑक्टोबरपर्यन्त विनामूल्य पाहता येईल.

No comments:

Post a Comment

Infosys promoter Shreyas Shibulal sells nearly 20 lakh shares for ₹317 crore

I n a letter to the BSE, Shreyas disclosed that he sold approximately 19.93 lakh shares in the open market on Wednesday and Thursday, at pri...