Tuesday, 8 October 2024

शॉपर्स स्टॉप’च्या वतीने आकर्षक फॅशन शो आणि नृत्य सादरीकरणासह 'गिफ्ट्स ऑफ लव्ह' या फेस्टिव्ह कलेक्शनचे अनावरण


मुंबई, 8 ऑक्टोबर 2024 (HPN):-
  भारतातील सर्वोच्च फॅशन, सौंदर्य आणि भेटवस्तू अशा सर्वच घटकांचे गंतव्य म्हणून लोकप्रिय असलेल्या शॉपर्स स्टॉपने अलीकडेच त्याची 'गिफ्ट्स ऑफ लव्ह' संकल्पना आणि लोगोचे अनावरण करून उत्सवी वातावरणाचा उत्साह द्विगुणित केला आहे. 

सेलिब्रिटी स्टायलिस्ट एडवर्ड लालरेम्पुयाने शैलीबद्ध केलेले आणि मार्क रॉबिन्सनने एका चित्तवेधक फॅशन शोद्वारे जिवंत केलेले, फेस्टिव्ह कलेक्शन प्रत्येकासाठी काहीतरी उपलब्ध करते. यामधून उत्सवाची भावनांचे पुरेपूर दर्शन घडते. 

फॅशन शो नंतर दिवाळी उत्सवाच्या आनंदमय उर्जेचे मूर्त स्वरूप असलेले एक उत्साहवर्धक नृत्य सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाने दिवाळीच्या परिपूर्ण उत्सवासाठी मंच तयार केला. ज्यात फॅशन, करमणूक आणि विशेष प्रस्ताव एका अद्वितीय आणि तल्लख अनुभवात एकत्र बांधण्यात आले.

"शॉपर्स स्टॉप हे भेटवस्तू आणि फॅशनचे अंतिम ठिकाण आहे. विविध श्रेणींमध्ये प्रेरणा, कल आणि मूल्यांसाठी ग्राहक आमच्यावर अवलंबून असतात. शॉपर्स स्टॉपवर, प्रत्येकजण या सणासुदीला आवडतील अशा अनेक श्रेणींमधील सर्वोत्तम ब्रँडसह विविध प्रकारच्या प्रस्तावांसह आम्ही आमची संकल्पना, गिफ्ट्स ऑफ लव्ह’वर खरे उतरू शकतो. त्याव्यतिरिक्त, शॉपर्स स्टॉपवर, ग्राहक खरेदीच्या अखंड अनुभवाची अपेक्षा करू शकतात. जे ग्राहक प्रथम दृष्टिकोनाप्रती आमची बांधिलकी प्रतिबिंबित करते. हीच गोष्ट यंदाच्या दिवाळीत आपल्याला मुलखावेगळी ठरवणार आहे.” ही माहिती कवींद्र मिश्रा, कस्टमर केअर असोसिएट, शॉपर्स स्टॉपचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ यांनी दिली.

प्रत्येक सण-उत्सवाचे औचित्य साधून पोशाख सादर करून, सणासुदीच्या काळातील संग्रहात समकालीन आणि पारंपरिक शैलींचे अखंडपणे मिश्रण केले जाते. ऑफिस मेजवानीसाठी किंवा घरगुती स्नेहभोजन प्रसंगी योग्य अशा कॉकटेल पोशाखांपासून ते घरच्या किंवा कौटुंबिक जेवणाच्या पूजेसाठी भरतकाम केलेले कुर्ते आणि लेहंग्यांपर्यंत, हा संग्रह आधुनिक खरेदीदार लक्षात ठेवून उत्सवाचा उत्साह साजरा करतो. स्टेटमेंट अॅक्सेसरीजसह आपल्या रुबाबात भर टाका किंवा मोहक कानातले तसेच आकर्षक वॉलेटसोबत परिपूर्ण भेट शोधा- सर्व एकाच छताखाली उपलब्ध आहेत.

कॅल्विन क्लेन, मायकेल कॉर्स, बिबा, व्हॅलेंटिनो, अरमानी एक्सचेंज, गेस आणि वर्साचे यासारख्या 500 हून अधिक प्रीमियम ब्रँडसह, शॉपर्स स्टॉप या दिवाळीला स्टायलिश आणि सहज अशा दोन्ही प्रकारच्या भेटवस्तू देते. नवीन संग्रहामध्ये कपडे, अॅक्सेसरीज आणि बरेच काही यासारख्या श्रेणींमध्ये विविध प्रकारच्या फॅशन आणि भेटवस्तू पर्यायांचा समावेश आहे. मग तो आकर्षक अरमानी एक्सचेंज पोशाख असो, स्टायलिश गेस घड्याळ किंवा प्रतिष्ठित वर्साचे अॅक्सेसरी असो, शॉपर्स स्टॉपमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे.

तुम्ही ऑनलाइन किंवा स्टोअरमध्ये खरेदी करण्यास प्राधान्य देत असलात तरीही, शॉपर्स स्टॉप 112 शॉपर्स स्टॉप स्टोअर्समध्ये आणि 50 हून अधिक शहरांमध्ये अखंड खरेदीचा अनुभव देते. तुमच्या जवळ असलेल्या दालनाला भेट द्या किंवा www.shoppersstop.com वर ऑनलाइन खास ऑफर पहा. 


No comments:

Post a Comment

Infosys promoter Shreyas Shibulal sells nearly 20 lakh shares for ₹317 crore

I n a letter to the BSE, Shreyas disclosed that he sold approximately 19.93 lakh shares in the open market on Wednesday and Thursday, at pri...