Friday, 15 September 2023

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड तर्फे ‘फर्झ निभाते हैं’ अभियानाचा शुभारंभ, सर्वांसाठी कर्जवितरणाप्रती बांधिलकी दृढ करणारे अभियान


ह्या सर्वमार्गांनी राबवल्या जाणाऱ्या अभियानाची संकल्पना रेडिफ्युजनची असून श्री. पंकज त्रिपाठी ह्यांचा समावेश

कस्टमाइझ्ड कर्ज उत्पादने देऊ करून बँकिंगसेवा न मिळालेल्या ग्राहकांच्या सक्षमीकरणावर तसेच सर्वसमावेशक वाढीसाठी प्रभावी एजंट म्हणून काम करण्यावर भर

मुंबई, १५ सप्टेंबर २०२३ (HPN): कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएल) ह्या विविधीकृत नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीने आपली पत समावेशाप्रती बांधिलकी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने फर्ज निभाते हैं हे अभियान सुरू केले आहे. ह्या सर्वांना आपल्याशा वाटणाऱ्या, भावनाप्रधान व महत्त्वपूर्ण सर्वमार्गीय ब्रॅण्ड अभियानामध्ये, भारतातील बँकिंग सेवेच्या कक्षेत न येणाऱ्या कर्जदारांप्रती, जबाबदारी अधोरेखित करण्यात आली आहे. 

रेडिफ्युजनची संकल्पना असलेल्या ह्या अभियानात सीजीसीएलचे मानवी मूल्य विधान दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्वसमावेशक वाढीचे कंपनीचे कार्य जिवंत करण्यात आले आहे. ब्रॅण्ड अँबॅसडर आणि प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी ‘फर्ज निभाते हैं’ अभियानातील 2 जाहिरातींमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. कंपनीची एमएसएमई कर्ज व सुवर्ण कर्ज उत्पादनांची जाहिरात ह्याद्वारे करण्यात आली आहे. हे एकात्मिक अभियान व्याप्ती, दृश्यमानता, प्रभाव ह्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे आणि ते टीव्ही, ओटीटी व यूट्यूबद्वारे प्रसृत केले जाणार आहे. ह्यामध्ये डिजिटल माध्यम अभियान व प्रत्यक्ष स्थळावर जाऊन केलेल्या उपक्रमांचाही समावेश असेल. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर स्तरावरील उपक्रमांच्या मार्फत अभियानाची व्याप्ती वाढवण्याची ब्रॅण्डची योजना आहे. 

कॅप्री ग्लोबलचे ग्रुप चीफ मार्केटिंग ऑफिसर श्री. बसंत धवन, ब्रॅण्ड अभियानामागील तत्त्व स्पष्ट करताना म्हणाले, “फर्झ निभाते हैं ह्या अभियानातून केवळ आमची व्यवसायाची सशक्त तत्त्वेच दिसत नाही, तर अधिक महत्त्वाचे म्हणजे वाढीची शक्यता खुली करणारी व आमच्या ग्राहकांमधील आत्मविश्वासाला चालना देणारी स्थितीस्थापक पायाभूत तत्त्वे उभी करण्याची आमची क्षमताही ह्यातून अधोरेखित होते. पुरेशा संधी निर्माण करून तसेच ह्या संधींचा लाभ घेण्यासाठी अखंडित कर्जपुरवठा करून समाजाची उन्नती साधण्यात मदत करणे हे आमचे कर्तव्य (फर्ज) आहे असे आम्हाला ठामपणे वाटते. आम्ही अनेकविध टचपॉइंट्सवर हे अभियान सुरू केले आहे आणि आमच्या ब्रॅण्डचे निकष उंचावण्यात हे अभियान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”

रेडिफ्युजनचे नॅशनल क्रिएटिव डायरेक्टर प्रमोद शर्मा म्हणाले, “आम्हाला ज्या क्षणी ह्या अभियानाची माहिती मिळाली, त्या क्षणीच ही देशाच्या गाभ्याशी खऱ्या अर्थाने संवाद साधण्याची संधी आहे हे आम्हाला समजले. कंपनीला समजून घेणे आणि त्यांनी घेतलेल्या जबाबदाऱ्या समजून घेणे अभियान यशस्वी करण्याची गुरूकिल्ली होती. आम्हाला सांगायच्या होत्या त्या गोष्टी तयार झाल्या आणि आमच्याकडे पंकज त्रिपाठी ह्यांच्यासारखे अभिनेते होते. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत ते प्राण फुंकतात. त्यामुळे जसे तुम्ही तुमचे कर्तव्य करता, तसेच कर्तव्य कॅप्री लोन्स सहज कर्जे उपलब्ध करून देऊन निभावते एवढेच आम्ही त्यांना सांगू शकलो.”

रेडिफ्युजनचे कार्यकारी संचालक आशीष मल्होत्रा म्हणाले, "भारतातील बहुसंख्या लोक कर्ज प्राप्त करण्यासाठी पात्र ठरत नाहीत, कारण, त्यांच्याकडे त्यासाठी आवश्यक कागदपत्र नसतात. मात्र ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यात ज्या भूमिका निभावतात, त्या भूमिका त्यांना पात्र ठरवत असतात. हेच सत्य आम्हाला पडद्यावर उभे करायचे होते. चरित्र व आशेच्या मानवी कथा सांगायच्या होत्या. तसेच त्यांना पुढे जाण्यात कॅप्री लोन्स कशा प्रकारे मदत करू शकते हेही त्यातून सांगायचे होते. जेणेकरून उर्वरित भारताप्रमाणे ह्या वर्गालाही कर्ज उपलब्ध व्हावे."

‘फर्ज निभाते हैं’चा अर्थ

आज कर्ज हे केवळ व्यक्तींच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे माध्यम राहिलेले नाही, तर त्यांच्या आर्थिक वाढीसाठी तसेच त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी घेतला जाणारा हा बूस्टर डोस आहे. भारतातील मोठ्या लोकसंख्येला अद्याप बँकिंच्या सुविधा मिळत नाही. वित्तीयदृष्ट्या भक्कम भविष्यकाळासाठी ह्या कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देण्याप्रती बांधिलकी मान्य करणे हा वित्तीय समावेशनाचा पाया आहे. कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडने भारतीय वित्तीय परिसंस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि देशातील दुर्गम भागांतील बँकिंग सेवा न मिळणाऱ्या लोकसंख्येला कर्जपुरवठ्याच्या कक्षेत आणण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.


No comments:

Post a Comment

Infosys promoter Shreyas Shibulal sells nearly 20 lakh shares for ₹317 crore

I n a letter to the BSE, Shreyas disclosed that he sold approximately 19.93 lakh shares in the open market on Wednesday and Thursday, at pri...