Friday, 23 February 2024

विद्युत सुरक्षा विषयक जनजागृतीसाठी “इकॅमेक्स – 2024” दि. २७ ते २९ फेब्रुवारी, २०२४ दरम्यान भव्य प्रदर्शन


“इकॅमेक्स – 2024” प्रदर्शनात विद्युत क्षेत्रातील देश – विदेशातील नामवंत उत्पादक व वितरक यांचा सहभाग* 

मुंबई, 23 फेब्रुवारी, 2024 (हिंदमाता): इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम) संघटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त ग्राहकांच्या विद्युत सुरक्षा विषयक जनजागृतीसाठी “इकॅमेक्स – २०२४” या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ग्राहकांना दि. २७, २८ व २९ फेब्रुवारी, २०२४ हया दरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (नेस्को), हॉल नं. २, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे १० ते ६ या वेळेत विनामूल्य पाहता येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दि. २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी १० वाजता होणार असून याप्रसंगी पॅालिकॅब, आर आर केबल, ग्रेटव्हाईट या उत्पादक कंपन्या तसेच अनेक संघटना, वीजवितरण व विद्युत व्यवसायाच्या निगडित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

“इकॅमेक्स – २०२४” या प्रदर्शनाचा मुख्य हेतू विद्युत सुरक्षा हा आहे. विद्युत अपघात मुक्त भारत घडविणे, विद्युत अपघात होऊ नयेत यासाठी घेण्यात येणारी सुरक्षा विषयक जागृती करणे, हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्युत क्षेत्रातील देश व विदेशातील नामवंत उत्पादक व वितरक या प्रदर्शनात सहभागी होणार असून या प्रदर्शनात वेगवेगळ्या जागतिक दर्जाचे विद्युत क्षेत्रातील तज्ञाची व्याख्याने सलग तीन दिवस आयोजित करण्यात आली आहेत. या प्रदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून इलेक्ट्रिकल कॉट्रॅक्टर्स, बिल्डर्स, कन्सल्टंट, इंजिनिअर्स, बांधकाम व्यावसायिक, अंतर्गत सजावटकार, शासकीय निम शासकीय अधिकारी, आर्किटेक्ट, ग्राहक व इंजिनिअरिंग कॉलेजचे  विद्यार्थी भेट देणार आहेत. या प्रदर्शनात जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, सोलार, इव्ही, युपीएस, स्टॅबिलाझयर, वायर्स, केबल्स, स्विचेस, पाईप, इन्व्हर्टर, सीटीपीटी, पोल, फीडर, पॅनेल्स, लाईट्स, इन्स्ट्रूमेंट्स, ऑटोमेशन इत्यादी उत्पादक कंपनी सहभागी झाल्या आहेत. तसेच क्रेडाई, सीएमा, ईएमा, कॅास्मा, ईमा आदी संघटना या प्रदर्शनात सहयोगी होत आहेत. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, उद्योग संघटना, महावितरण, टाटा पॅावर, अदानी इलेक्ट्रीक यांचे भरीव सहकार्य लाभले आहे. या प्रदर्शनात आयएसआय, आयएसओ उत्पादक सहभागी होत असल्याने ग्राहकांना दर्जेदार उत्पादने पाहण्याची व अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. 

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम) ही १०० वर्षे अविरत काम करणारी एक नामांकित आणि वैभवशाली इतिहास लाभलेली जागतिक स्तराची संघटना आहे. संघटनेचे अध्यक्ष वामन भुरे, जनरल सेक्रेटरी देवांग ठाकुर, उपाध्यक्ष उमेश रेखे, खजिनदार रावसाहेब रकिबे, सहकारी संचालक मारुती माळी, नरेंद्र शिंदेकर, सुरेश पोटे, अमेय कन्नव, अमोल कोळपकर, प्रकाश जाधव तसेच इतर सर्व पदाधिकारी यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही संघटना दिवसेंदिवस प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. या संघटनेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून संघटनेचे पाच हजार सभासद आहेत. महाराष्ट्रात संघटनेचे आठ विभाग काम करत आहेत. यामध्ये पुणे, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण येथे विभागीय कार्यालय आहेत. सरकारी परवानाधारक विद्युत ठेकेदार आणि प्रामुख्याने वीज ग्राहक यांच्या समस्या सोडविणे, ग्राहकांच्या मध्ये विद्युत सुरक्षा विषयक जागृती करणे अशी कामे केली जातात. सर्व विद्युतिकरणाची कामे ही मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदरांकडूनच करून घेणे हा कायदेशीर संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावा यासाठी इकॅम सतत प्रयत्न करत असते.Ends

No comments:

Post a Comment

Sidharth’s Solo Show by Aura Art, at Jehangir Art Gallery (November 4-10, 2025)

MUMBAI, 5 NOVEMBER, 2025 (HNS): Aura Art presents ‘Fables of the Fabulous’, a Solo Show of Paintings and Sculptures by Sidharth, from Novem...