Wednesday 20 March 2024

मुंबईतील म्युझिक क्रिएटर्सना सक्षम करण्यासाठी – माय म्युझिक माय राइट्स, क्रिएटर्स कनेक्ट वर्कशॉपचे आयोजन


मुंबई
20 मार्च, 2024 (हिंदमाता)– संगीत क्षेत्रात बौद्धिक मालमत्तेविषयी (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी) जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी तसेच म्युझिक क्रिएटर्स व स्वतंत्र कलाकारांना संगीत व्यवसाय आणि प्रकाशनाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींची माहिती देण्याच्या हेतुने इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लि. (आयपीआरएस) या लेखकसंगीतकार आणि संगीत प्रकाशकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थेने देशभरात ‘माय म्युझिक माय राइट्स या देशव्यापी कॅम्पेनची सुरुवात केली आहे. या कॅम्पेनचा एक भाग म्हणून आयपीआरएसने एका संवादी कार्यशाळेचे आयोजन केले होते. ‘माय म्युझिक माय राइट्स असे नाव असलेली ही कार्यशाळा डॉल्बी लॅब्जच्या सहकार्याने मुंबईत आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा आयपीआरएसच्या देशभरातील म्युझिक क्रिएटर्सना सक्षम करण्याच्यात्यांना पाठिंबा देण्याच्या बांधिलकीतला महत्त्वाचा टप्पा आहे.

ईवायने नुकत्याच केलेल्या द म्युझिक क्रिएटर इकॉनॉमी – द राइज ऑफ म्युझिक पब्लिशिंग इन इंडिया नावाच्या सर्वेक्षणात भारतात दरवर्षी 20,000 ओरिजनल गाणी तयार होत असलीतरी म्युझिक क्रिएटर्सना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे तपशीलवार मांडण्यात आले आहे. या आव्हानांमध्ये आर्थिक अडथळे आणि सुधारित संगीत निर्मिती कौशल्यांची गरज तसेच मॉनेटायझेशनची धोरणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. केवळ 60 टक्के जण संगीतावर आधारित काम करण्यातून जगण्यापुरते पैसे मिळवू शकत असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. ‘माय म्युझिक माय राइट्स हे कॅम्पेन या आव्हानांवर मात करण्यासाठी कार्यशाळासेमिनार्स आणि इतर उपक्रमांचे ऑनलाइन व ऑफलाइन आयोजन करत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून क्रिएटर्सना संगीत उद्योगात प्रभावीपणे काम करण्यासाठी सक्षम केले जाते.

या कार्यक्रमात या क्षेत्रातील कुशल क्रिएटर्स आणि त्यांचे समकालीन क्रिएटर्स यांच्याशी अर्थपूर्ण संवाद साधला गेला. आघाडीचे कलाकार व पॅनेलिस्ट अतुल चुरामानी, टर्नकी म्युझिक आणि पब्लिशिंग, पद्मनाभन एनएस, प्रमुख, आर्टिस्ट अँड लेबल पार्टनरशीप, स्पॉटिफाय इंडिया, करण ग्रोव्हर, वरिष्ठ संचालक- भारत, मध्य पूर्व आणि आफ्रिका, डॉल्बी लॅब्ज, दिव्या भाटिया, फेस्टिवल संचालक आणि निर्माते जोधपूर आरआयएफएफ आयुषमान सिन्हा, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रिप्रेझेंट मॅनेजमेंट, अखिला शंकर, प्रमुख ट्युनकोअर दक्षिण आशिया आणि राघव मियाटले, गायक- गीतकार, संस्थापक- First.wav या वेळी उपस्थित होते.

मुंबई व जवळपासचे स्वतंत्र कलाकार आणि म्युझिक क्रिएटर्स या कार्यशाळेसाठी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांना गीतलेखन, रॉयल्टी व हक्कांचे व्यवस्थापन, डॉल्बी अ‍ॅटमॉससह आधुनिक ध्वनी निर्मिती तंत्र आणि संगीत उद्योगातील कलाकारांचा प्रवास याविषयी मौल्यवान माहिती मिळाली. यावेळी सहभागींना नेटवर्किंगच्या संधी व पर्यायाने संभाव्य सहकार्याची शक्यता जाणून घेता येईल. या अनोख्या अनुभवाच्या मदतीने सहभागींना सातत्याने बदलत असलेल्या संगीत क्षेत्रात विकास करण्यासाठी आवश्यक साधने व प्रेरणा मिळण्यास मदत झाली.

गायक- गीतकार, संस्थापक – First.wav राघव मियाटले म्हणाले, ‘माझ्या बरोबरीच्या इतर संगीतकारांच्या संघर्षाची मला जाणीव आहे. माय म्युझिक माय राइट्स कॅम्पेनच्या माध्यमातून आयपीआरएससह केलेले सहकार्य त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. ‘माय म्युझिक माय राइट्स’ कॅम्पेन क्रिएटर्सना त्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्याविषयी माहिती देणारे तसेच कलाकारांना आपला विकास करण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणाऱ्या यंत्रणेस चालना देणारे आहे. गुणवत्तेप्रती आयपीआरएसची बांधिलकी आणि क्रिएटर्सच्या हक्कांसाठी उभे राहाणे कौतुकास्पद आहे. संगीत क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग तयार करणाऱ्या घडामोडींचा भाग होताना मला आनंद वाटत आहे.’

याविषयी आपले मत व्यक्त करताना आयपीआरएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश निगम म्हणाले, संगीत क्षेत्र नवी उंची गाठत असताना गीतकारसंगीताकार आणि स्वतंत्र क्रिएटर्सना त्यांच्या हक्कांची संपूर्ण माहिती असणं व त्याच्या मदतीने शाश्वत करियर उभारता येणं खूप महत्त्वाचं आहे. आयपीआरएसमध्ये आम्ही म्युझिक क्रिएटर्सना शिक्षण आणि तज्ज्ञांच्या मदतीने सक्षम करण्यास प्राधान्य देतो. संगीताचा समृद्ध वारसा आणि संगीताचे आपल्या आयुष्यातील मूल्य जाणून घेत संगीत क्षेत्राला पाठिंबा देण्याचीत्याचा विकास करण्याची सामाईक जबाबदारी हाती घेऊया व या क्षेत्राला अधिक चांगले भविष्य मिळवून देऊया. माय म्युझिक माय राइट्स हे कॅम्पेन भारतातील म्युझिक क्रिएटर्सना सक्षम करण्याची आयपीआरएसची बांधिलकी जपणारे आहे. कोलकातादिल्ली आणि पुणे शहरात आगामी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून त्याद्वारे आयपीआरएसने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून सर्वसमावेशक व न्याय्य संगीत क्षेत्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

No comments:

Post a Comment

Pune-headquartered Piotex Industries Limited IPO opens May 10, 2024; price band fixed at Rs. 94

The issue will be closed on Tuesday, May 14, 2024 IPO comprises a fresh issue of 15,39,600 equity shares with a face value of Rs. 10 each Th...