Monday, 2 March 2020

मा. मंत्री स्मृती ईराणी आणि बी.एस. नागेश यांच्या हस्ते रिटेल उद्योगातील ‘ट्रॅन रिटेल पुरस्कार २०२०’ चे वितरण


मुंबई, २ मार्च २०२०:- ट्रस्ट फॉर रिटेलर्स अँड रिटेल असोलिएट्स ऑफ इंडिया (TRRAIN) अर्थात ट्रॅन ही एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असून तिचे उद्दिष्ट रिटेल क्षेत्रात परिवर्तन घडवण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे आहे. शॉपर्स स्टॉपचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन बी. एस. नागेश यांनी या ट्रस्टची स्थापना केली. मुंबईत आज ९ व्या ट्रॅन रिटेल अवॉर्ड्स २०२० चे आयोजन करण्यात आले.
ट्रॅन रिटेल अवॉर्ड्स हे जगातील एकमेव पुरस्कार असे आहेत, जे रिटेल उद्योगातील अपवादात्मक ग्राहक सेवेस मान्यता देतात. या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय महिला व बालविकास तथा वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
रिटेलसंबंधी वातावरण, त्याची वृद्धी आणि महिला रोजगाराचे भवितव्य या विषयावर ट्रॅनचे संस्थापक श्री बी.एस. नागेश आणि श्रीमती स्मृती झुबिन इराणी यांच्यामध्ये पुरस्कार वितरण सोहळ्यात मुक्त संवाद झाला. या प्रसंगी या क्षेत्रातील किशोर बियाणी, सी.एल. रहेजा, नेक्सस माल्सवेअरचे सीईओ दलिप सेहगल यांच्यासारखे दिग्गज व्यक्ती उपस्थित होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना केंद्रीय महिला व बाल विकास तथा वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी म्हणाल्या, ‘‘किरकोळ क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणे याच लज्जास्पद असे काहीही नाही. मी मॅकडोनाल्डमध्ये नोकरीला सुरुवात केली तेव्हा माझे काम झाडू-पोछा करण्याचे होते. पण कॅशिअर पदावर काम करण्याची माझी महत्त्वाकांक्षा होती…. मी एक रिटेल कर्मचारी होते.”
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्वांना बोलताना ट्रॅनचे संस्थापक बी. एस. नागेश म्हणाले, ‘ ट्रॅन रिटेल अवॉर्ड्स हे फ्रंट एंड रिटेल असोसिएट्सने अखंड समर्पण, मेहनत आणि कौशल्याचे प्रमामपत्र आहे. सतत वाढणाऱ्या रिटेल उदयोगाचे ते प्रतिनिधीत्व करतात. ते ग्राहकांचे मनोरंजन करतात आणि ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या त्यांना उत्साहित करण्याचे काम करतात. रिटेल क्षेत्राची मुख्य संपत्ती असलेल्या  ग्राहकांप्रति नम्रपणा, आपुलकी, उत्साह आणि वचनबद्धता ही सर्व गुणवैशिष्ट्ये ट्रॅनकडून साजरी केली जातात तसेच त्याचे कौतुकही केले जाते.  .”
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती स्मृती झुबिन इराणी आणि श्री बी. एस. नागेश यांच्या हस्ते अॅपरल, डिपार्टमेंट स्टोअर, मॉल्स, स्पेशलिटी स्टोअर्स आणि क्यूएसआरएस या गटांनुसार, समर्पण आणि परिश्रमांंच्या आधारे रिटेल  क्षेत्रातील रिटेल असोसिएट्सला पुरस्कारांचे वितरण करण्यात आल. अजित जोशी यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळाने तसेच जॉयदीप भट्टाचार्य, हेमंत तवारे, हर्षिता गांधी इत्यादींच्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षकांनी अनेक फेऱ्या आणि मूल्यांकनानंतर विजेत्यांची निवड केली.
रिलायन्स रिटेलचे बबलू मंडल, टीबीझेडचे मनीष शर्मा आणि स्टार बाजारचे सलीम पटनाकर यांना अनुक्रमे अखंडता, बिइंग ह्युमन आणि पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी पुरस्कार देण्यात आले. भाषणाच्या अखेरीस ट्रॅनचे संस्थापक बी.एस. नागेश यांनी उपस्थित सर्वांचे उत्तम श्रोत्याची भूमिका पार पाडल्याबद्दल आभार मानले. रिटेल उद्योगातील नेत्यांच्या पुढील पिढीला मदत केल्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ट्रॅनबद्दल माहिती:
ट्रॅन ही बी.एस नागेश यांनी २०११ मध्ये स्थापन केलेली सार्वजनिक सेवाभावी संस्था असून ती रिटेल क्षेत्रातील लोकांना सक्षम बनविण्यासाठी तसेच येथील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात तत्काळ आणि दीर्घकालीन परिवर्तन करण्याच्या उद्देशाने काम करते. रिटेल उद्योगांतील लोकांचे कार्यालयीन आणि घरगुती आयुष्य सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध  आहोत.
ट्रॅन एज्युकेशन प्रोग्रामच्या माध्यमातून रिटेल असोसिएट्सचे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी तसेच ट्रॅन रिटेल अवॉर्ड्स आणि रिटेल एम्प्लॉइज डेच्या माध्यमातून त्यांची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान वाढवण्याचे काम केले जाते.  दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षण आणि नोकरी देऊन रिटेल क्षेत्रात मोठी कामगार शक्ती उभी करण्याच्या कार्याला या क्षेत्रातून मोठा पाठींबा मिळत आहे.

No comments:

Post a Comment

Infosys promoter Shreyas Shibulal sells nearly 20 lakh shares for ₹317 crore

I n a letter to the BSE, Shreyas disclosed that he sold approximately 19.93 lakh shares in the open market on Wednesday and Thursday, at pri...